28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषपंतप्रधानांच्या हस्ते २८ मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते २८ मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

डिसेंबर २०२०मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाची पायाभरणी करण्यात आली होती

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या आलिशान अशा नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. या नवीन चार मजली इमारतीमध्ये १२००हून अधिक खासदार एकावेळी बसू शकतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले.‘नवीन इमारत आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक आहे,’ असे सरकारने या निमित्त प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याआधी हा उद्घाटन सोहळा मोदी सरकारच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात येणार असल्याचे वृत्त होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मात्र आता हा सोहळा २८ मे रोजी होत आहे.डिसेंबर २०२०मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाची पायाभरणी करण्यात आली होती. नवीन इमारत हा ‘सेंट्रल व्हिस्टा’च्या पुनर्विकासाचा एक भाग आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने ही इमारत बांधली आहे. भारताचा लोकशाहीचा वारसा असणाऱ्या नवीन संसदेच्या इमारतीमध्ये संसदीय कामकाजासाठी मोठे सभागृह, संसद सदस्यांसाठी विश्रामगृह, एक वाचनालय, विविध समित्यांच्या खोल्या, जेवणासाठी जागा आणि पुरेशी पार्किंगची जागा असेल.

हे ही वाचा:

पेसमेकर बसवलेल्या महिलेचा एव्हरेस्ट सर करताना मृत्यू !

काँग्रेस प्रवेश केला, राजदूतपद काढले; गिर्यारोहकाने केली म. प्र. सरकारवर टीका !

इम्रानच्या घराबाहेर पोलिस छाप्याच्या तयारीत !

वानखेडेंवरील प्रतिज्ञापत्रात फ्लॅट, महागडी घड्याळे, परदेश दौरे

नवीन संसदेत, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही मार्शलना नवीन ड्रेस कोड असेल. केंद्रातील आपल्या सरकारच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त, भाजपने महिनाभराचा कार्यक्रम आखला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या रॅलीसह वरिष्ठ नेत्यांच्या ५१ सार्वजनिक सभा होणार आहेत. ३० मे २०१९ रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली होती. त्यामुळे या तारखेपासूनच ही मोहीम सुरू होण्याची अपेक्षा आहे, जी ३० जूनपर्यंत सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले. ३० किंवा ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या मोहिमेचा दणक्यात शुभारंभ केला जाईल, असे समजते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा