मुंबई आणि नागपूर शहराला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज, ४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्यासोबतच नागपूर मेट्रोच्या रिच टू व रिच थ्री याचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या महामार्गाची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पाहणी करत आहेत. या पाहणी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदी यांचा दौरा व कार्यक्रमाची माहिती समजून घेतली आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला वीस हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या संपूर्ण भागाला समृद्धी देणारा हा रस्ता आहे आणि या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिले आहे यातच आम्हला समाधान आहे. ज्या पद्धतीने हा रस्ता आहे, एक समृद्धी एक्सप्रेस वेगवान रस्ता त्याच पद्धतीने आमचे सरकार काम करत आहे. अनेक निर्णय आम्ही वेगाने घेतले आहे. सर्वांना सोबत घेऊन आम्ही वेगाने काम करत आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय
जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार
ईडीकडून अकरा कोटींची सुपारी जप्त
व्यवसायातील नुकसानीमुळे ताज हॉटेलच्या १०व्या मजल्यावरून त्याने मारली उडी
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत महामार्गाची पाहणी केली आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर हि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे.