25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषजय श्रीराम: प्रभू श्रीरामांच्या आजोळातून ३ हजार क्विंटल तांदूळ, सासरकडून सुका मेवा!

जय श्रीराम: प्रभू श्रीरामांच्या आजोळातून ३ हजार क्विंटल तांदूळ, सासरकडून सुका मेवा!

राम मंदिर सोहळ्यासाठी देश-विदेशातून वस्तूंची आवक

Google News Follow

Related

अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेकाची तारीख आता अगदी जवळ आली आहे. मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून अयोध्येला अनेक वस्तू पोहोचवल्या जात आहेत, ज्यामध्ये प्रभू रामांच्या आजींच्या घरून येणारे तीन हजार क्विंटल तांदूळ आणि सासरच्या घरातून येणाऱ्या भेटवस्तूंचा समावेश आहे.प्रभू राम मंदिराचा उदघाट्न सोहळा २२जानेवारी रोजी पार पडणार आहे.तशी तयारीही जोरदार सुरु आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही वस्तू पाठवण्यात येत आहेत. प्रभू रामांचे आजोळ छत्तीसगडमधून तीन हजार क्विंटल तांदूळ येत आहेत, त्याचप्रमाणे नेपाळमधील त्यांच्या सासरच्या जनकपूर येथून कपडे, फळे आणि सुक्या मेव्यासह भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० ताटांची आवक होत आहे. याशिवाय भारतातील विविध राज्यांतून बराचसा माल अयोध्येत येणार आहे.

२२ जानेवारीला प्रभू रामांचा अभिषेक होईल.यानंतर प्रभू श्री रामाला विशेष नैवेद्य दाखवला जाणार आहे, ज्यामध्ये प्रभू रामांच्या आजोळातून आलेले तांदूळ आणि सासरच्या घरातील सुका मेवा असणार आहे.हे तांदूळ छत्तीसगडमधील जिल्ह्यांतून गोळा करण्यात आले आहे.

प्रभू रामांची सासरवाडी असलेले नेपाळ मधील जनकपूर येथून कपडे, फळे आणि सुका मेवा ५ जानेवारीला अयोध्येत पोचणार आहे.याशिवाय भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० थाळ्याही असणार आहेत.तसेच नेपाळमधून ५१ प्रकारची मिठाई, दही, लोणी आणि चांदीची भांडी ,दागिने,कपडे यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य हिंदू धर्माविषयी ओकली गरळ

मालाडमधील १३०० हेक्टर जमिनीवर होणार विकास!

खासदार जलील म्हणतात, राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रांचा वापर!

अष्टधातुने बनवलेली २१०० किलोची घंटा उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून राम लल्लाच्या दरबारात पोहचणार आहे. असा दावा केला जात आहे की, ही देशातील सर्वात मोठी घंटा असेल, ज्याची किंमत २५ लाख रुपये आहे.ही घंटा बनवण्यासाठी ४०० कर्मचारी गुंतले आहेत.या घंटाची रुंदी १५ फूट आणि आतील बाजूची रुंदी ५ फूट आहे.ही घंटा बनवण्यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी लागला आहे.

प्रभू रामांच्या अभिषेकासाठी गुजरातमधील वडोदरा येथून १०८ फूट लांब अगरबत्ती अयोध्येला पाठवली जात आहे, जी तयारी झाली आहे.ही अगरबत्ती पंचगव्य आणि हवन घटकांसह शेणापासून बनवली गेली आहे.या अगरबत्तीचे वजन ३५०० किलो आहे.या अगरबत्तीची किंमत पाच लाखांपेक्षा जास्त असून ती बनवण्यासाठी ६ महिने लागले आहेत.ही अगरबत्ती ११० फूट लांबीच्या रथातून वडोदरा ते अयोध्येला पाठवली जाणार आहे.विहा भारवाड या कारागिराने ही अगरबत्ती बनवली आहे.ही अगरबत्ती एकदा पेटवली की दीड महिना सतत जळत राहील, असे विहा भारवाड यांनी सांगितले.

राममंदिराच्या अभिषेकनंतर प्रभूंच्या पादुका तिथे ठेवण्यात येणार आहेत.सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत. या पादुका देशभर फिरून १९ जानेवारीला अयोध्येला पोहोचतील.हैदराबादचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका बनवल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा