24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषराजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन उत्साहात

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन उत्साहात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न

Google News Follow

Related

शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा..

समृद्धी महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने

ओलिस मुक्त होत नाहीत तोपर्यंत गळ्यात ‘डॉग टॅग’ घालणार!

केरळमधील अपहरण झालेल्या ६ वर्षीय मुलीची अखेर सुटका!

पप्पू अखेर २४व्या प्रयत्नांत पास!

मुख्यमंत्री शिंदे यांनी ४  जून २०२३ रोजी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचे रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असे वसतिगृह देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण करून, सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून ९० दिवसात वसतिगृहाचे पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाचे कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले.रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात, तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. वसतिगृहाचे उद्घाटन करण्या पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचे लोकार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देवून या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. त्या मातांशी त्यांनी संवादही साधला.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा