पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय रेल्वेच्या पहिल्या ‘वंदे मेट्रो ट्रेन’ सेवेला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने अधिकृतपणे वंदे मेट्रोचे नाव बदलून ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ असे केले. भारतीय रेल्वेची पहिली वंदे मेट्रो ही गुजरातमधील अहमदाबाद आणि भुज दरम्यान धावणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१६ सप्टेंबर) गुजरात दौऱ्यावर होते. जूनमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच गुजरात दौरा होता. पंतप्रधानांनी दौऱ्यादरम्यान अनेक विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी केली. तसेच अहमदाबादमध्ये सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवसांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भारताच्या पहिल्या ‘वंदे मेट्रो ट्रेन’चे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रोची ओळख ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ अशी करण्यात आली आहे.
‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ ही अहमदाबाद-भुज दरम्यान धावणार असून ती ९ स्थानकांवर थांबणार आहे, ताशी १३० किलोमीटर असा वेग असणार आहे. अहमदाबाद-भुज दरम्यानचे ३६० किलोमीटरचे अंतर ५.४५ तासात कवर करेल. आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. अहमदाबाद-भुज या वंदे मेट्रोचा क्रमांक-९४८०१ असून, शनिवारी ही धावणार नाही. तर भुज-अहमदाबाद वंदे मेट्रोचा क्रमांक- ९४८०२ असून, ही रविवारी धावणार नाही. १७ सप्टेंबरपासून अहमदाबादहून सुटणाऱ्या ट्रेनसह प्रवाशांना नियमित सेवेचा लाभ घेता येणार आहे. संपूर्ण ट्रिपचे भाडे ४५५ रुपये असेल.
हे ही वाचा :
भारताच्या हॉकी संघाने दक्षिण कोरियाला नमवत अंतिम फेरीत मारली धडक !
गेल्या १०० दिवसांत खूप अपमान झाला, पण ध्येयासाठी मी शांत राहिलो!
महाराष्ट्र भिकेला लावण्याचे डोहाळे…
तालिबानी सरकारला नको पोलिओ लसी; आणली स्थगिती