भारतीय जनता पार्टीच्या खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते शनिवार, २० ऑगस्ट रोजी विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबई चांदिवली येथील श्री संकट मोचन हनुमान मंदिराचे उद्घाटन केले असून, हे मंदिर लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी आणि लोकांनी उपस्थिती लावली होती.
मुंबई चांदिवली येथील नेताजी नगर येथील खाडी क्रमांक ३ येथील संकट मोचन हनुमान मंदिराचा भूमिपूजन सोहळा ३१ जानेवारी २०२२ रोजी पार पडला होता. त्यानंतर शनिवार, २० ऑगस्ट रोजी खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते या मंदिराचे उदघाटन झाले आहे. यावेळी अनिल गलगली (पत्रकार), किशोर ढमाळ, सुषमा सावंत, प्रकाश मोरे, प्रदीप बंड, कैलास आगवणे, रत्नाकर शेट्टी, हरविलास चौहान, शंकर कोळी, बनशीलाल सिंग, अजीज खान आदी मान्यवर पूनम महाजन यांच्यासोबत उपस्थित होते.
हे ही वाचा:
दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल महाविद्यालय उभारणार
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”
सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी
यावेळी पूनम महाजन यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाबद्दल लोकांना आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक तर आहेच मात्र त्यासोबतच आपला परिसरदेखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.