विलेपार्लेमध्ये घरांना तडे जाऊन आठ झोपड्या कोसळल्या

मुंबईतील विलेपार्ले येथे रविवार, २५ सप्टेंबर रोजी रात्री काही घरे कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

विलेपार्लेमध्ये घरांना तडे जाऊन आठ झोपड्या कोसळल्या

मुंबईतील विलेपार्ले येथे रविवार, २५ सप्टेंबर रोजी रात्री काही घरे कोसळल्याची माहिती समोर आली आहे. तर ४० पेक्षा जास्त घरांना तडे गेले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. ही घरं नाल्यावर बांधलेली होती. मुंबई महापालिकेच्या सुचनेनुसार आधीच ही घरं रिकामी करण्यात आली होती. यामुळे या घरांमध्ये कुणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे आजुबाजूच्या घरांना तडे गेले आहेत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. यातील आठ ते दहा घर कोसळली आहेत. तर आणखी ४० घरांना तडे गेले आहेत. यातील काही घरे नाल्यालगतची कोसळू शकतात, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

विलेपार्ले पश्चिमेकडे जुहू रोड परिसरात मिठीबाई महाविद्यालयाच्याजवळ दुमजली झोपड्या आहेत. याच झोपड्यांजवळ मेट्रोचं काम सुरू आहे.

Exit mobile version