उत्तरप्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात २०२४ च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी बोलवण्यात आलेल्या कॉंग्रेसनेत्यांच्या बैठकीत राहुल गांधी नाराज झाले. उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेस नेते हे नेहमी केंद्रीय नेतृत्वाच्या भरोशावर राहतात त्यामुळे इथे पक्ष पण उभा राहू शकत नाही आणि पक्षाला निवडणुकीत जिंकताही येत नाही. या उलट तेलंगणामध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या सहकार्याने पक्ष उभा केला आणि निवडणुकीत यशही मिळवले, असे खडेबोल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या बैठकीत सुनावले.
हेही वाचा..
संसद भावनाची सुरक्षा आता ‘सीआयएसएफ’ करणार
ड्रोन हल्ल्याच्या भीतीने १८ जानेवारीपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू!
आता आम्ही कोणतीही मशीद गमावणार नाही…
तैवानवरून चीन आक्रमक; अमेरिकेला दिला इशारा
सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये उत्साही नेत्यांची कमी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची बांधणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये तीन नेते सुद्धा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने बघत नाहीत आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे दिसत नाही, त्यामुळे पक्षावर हि वेळ आल्याचे गांधी यांनी म्हटले आहे. आणखी एक कॉंग्रेस नेता म्हणाला, येणाऱ्या निवडणुकीकडे मुस्लीम समाज कॉंग्रेस पक्षाकडे डोळे लावून बसला आहे. कॉंग्रेसने समाजवादी पक्षाबरोबर युती करण्याची गरज आहे. बसपा बरोबर युतीबरोबर चर्चा होऊ शकते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीत कॉंग्रेस नेत्यांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची या बैठकीला उपस्थिती होती.