बांगलादेश सरकारने केले कबूल, म्हणाले हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या!

७० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती

बांगलादेश सरकारने केले कबूल, म्हणाले हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या!

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांवर विशेषतः हिंदुंवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या, येत आहेत. भारतासह इतर देशांनी यावर चिंता व्यक्त करत कारवाई करण्याचे मागणी बांगलादेश सरकारकडे केली होती. हिंदुंवरील अत्याचाराविरुद्ध देशासह राज्यातही निदर्शेन, आंदोलने होत आहेत. मात्र, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही, अथवा हिंदूंच्या संरक्षणाची हमी देखील दिली नाही. यावरून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, आता बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार झाल्याचे सरकारने कबूल केले आहे.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी आपले पद सोडल्यानंतर बांगलादेशने अल्पसंख्याकांवरील, प्रामुख्याने हिंदूंविरूद्ध जातीय हिंसाचाराच्या ८८ घटनांची कबुली दिली आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनीही सांगितले की, या घटनांमध्ये ७० जणांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर

अवॉर्ड शोसाठी बोलावून अभिनेत्याचे अपहरण, १२ तास केले अत्याचार!

“अध्यक्षांचा आदर करू शकत नसाल तर सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही”

दिल्ली विधानसभेसाठी ‘आप’ची काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता नाहीचं!

शफीकुल आलम यांनी पत्रकारांना सांगितले की, ५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबरपर्यंत अल्पसंख्याकांशी संबंधित घटनांमध्ये एकूण ८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी अल्पसंख्यांकांवरील हल्ल्याच्या घटनांवरून भारत चिंतेत असल्याचे व्यक्त केल्यानंतर एका दिवसानंतर शफीकुल आलम यांनी हा खुलासा केला.

(ईशान्य सुनमगंज, (मध्य) गाझीपूर आणि इतर भागातही हिंसाचाराच्या नवीन घटनांची नोंद झाल्यामुळे प्रकरणे आणि अटकेची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे शफीकुल आलम यांनी सांगितले. ते म्हणाले की, अशी काही प्रकरणे देखील असू शकतात ज्यामध्ये काही पीडित पूर्वीच्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य असू शकतात. काही घटना वगळता हिंदूंवर त्यांच्या धर्मामुळे हल्ले झालेले नाहीत, असे अंतरिम सरकारचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई करत असल्याचे शफीकुल आलम यांनी सांगितले.

 

Exit mobile version