विश्वास नाही बसत?… गुजरातच्या पांचोट गावातील कुत्रे आहेत करोडपती !

कुत्र्यांची सेवा करण्याची ७० वर्षांपासून चालत आलेली परंपरा.गावातील एक-दोन नाही तर तब्बल ३०० कुत्रे करोडपती आहेत

विश्वास नाही बसत?… गुजरातच्या पांचोट गावातील कुत्रे आहेत करोडपती !

शहरातील रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना आपण पाहिलच असेल. लोकांचा भटक्या कुत्र्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेग-वेगळा असतो.कोणी त्यांना जवळ करून खायला घालत तर कोणी मारण्याचा प्रयत्न करत,”ना घर का ना घाट का ”अशी म्हण शहरातील भटक्या कुत्र्यांना लागू होते. गुजरातमधील पांचोट गावातील मात्र ही परिस्थिती उलटी आहे, भागातील कुत्रे हे करोडपती आहेत. तर तेथील लोक वर्षानुवर्षे त्यांची सेवा करतात.

गुजरात मधील मेहसाना जिल्ह्यातील पांचोटगाव या गावातील एक-दोन नाही तर तब्बल ३०० कुत्रे करोडपती आहेत.पांचोट गावात जीवदयेच्या भावनेला अनुसरून स्थानिक लोकांनी ७० वर्षांहून अधिक काळ कुत्र्यांची सेवा करण्यासाठी ‘कुटारीयु’ नावाने त्यांच्या साठी राखीव जमिनी ठेवण्यात आल्या आहेत .त्या राखीव जमिनीची सध्याची किंमत कोटींच्या घरात आहे. पांचोट गावात कुत्र्यांसाठी राखीव जमीन म्हणून २२ एकर आहे ,सध्या तेथील एकराची किंमत तब्बल ६०-८० लाख  इतकी असून सर्व जमिनीची सध्याची किंमत १३ कोटीहून अधिक आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा पोलिसांच्या जाळ्यात

NASA : २१ वर्षांपूर्वी आकाशात झेपावलेला स्पेसक्राफ्ट कोसळले; अनर्थ टळला !

आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद

एक लाख पुस्तकांच्या सड्याने डोंबिवलीचा फडके रोड बहरला

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १२५ वर्ष पूर्वी जेव्हा गाव वसले तेव्हा दान दिल्याने पुण्य वाढते या हेतूने तेथील दहा-बारा लोकांनी कुत्र्यांसाठी जमिनी दान दिल्या. हळू हळू वेळ बदलत गेल्याने दान दिलेल्या लोकांच्या मुलांकडून याचे ट्रस्टी मध्ये रूपांतर करण्यात आले. छगन पटेल, गावांचे विश्वस्त मधनी पाटी कुटरिया ट्रस्टचे अध्यक्ष यांनी सांगितले की, ही प्रथा गावातील वडीलधाऱ्यांनी सुरू केली होती ज्यांना मुले नाहीत किंवा जवळचे नातेवाईक नाहीत ते मालमत्ता सोडतात, काहींनी त्यांच्या कमी उत्पादक जमिनीचा एक छोटा तुकडा धर्मादाय म्हणून दान केला होता.

त्यांनी सांगितले ७० वर्षांपूर्वी आमच्या परिवारातील शेतकरी ईश्वर चतुर पटेल कुटुंबाने पहिली जमिनी दान देऊन याची सुरुवात केली. काही वर्षांपूर्वीपर्यंत जमिनीच्या किमती जास्त नव्हत्या, त्यामुळे छोटासा भूखंड दान करणे ही फार मोठी गोष्ट नव्हती. तथापि, आता, एका हायवे प्रकल्पामुळे मेहसाणा ते गाव हे अंतर ७ किमीने कमी झाले आहे आणि मार्गावरील जमिनीच्या किमती खूप वाढल्या आहेत,” पटेल म्हणाले.

त्यामुळे आमच्या गावातील कुत्र्यांना करोडपती मानले जाते असेही म्हणाले. नोंदणीमध्ये जमिनी मालकांच्याच नावावर आहेत मात्र ट्रस्ट या जमिनीची देखभाल करते आणि कुत्र्यांचीही देखभाल करते. पटेल म्हणाले,आमच्या गावातील लोक दर पाच वर्षाने गोळा होतात तेव्हा या राखीव जमिनींची पाच वर्षांकरिता भाडे तत्वावर बोली लावली जाते.जो जास्त बोली लावतो त्याला ह्या जमिनी शेतीसाठी भाडेतत्वावर दिले जाते.भाडेकरू दरवर्षी बोली लावलेली रक्कम ट्रस्टी मध्ये जमा करतो.मिळालेल्या रकमेतून कुत्र्यांसाठी शिरा ,रोटी बनवून सर्व कुत्र्यांना वाटले जाते.

येथे दरदिवशी २० ते ३० किलो पिठांपासून ८०-९० रोटला- म्हणजे रोटी बनवली जाते आणि गावातील बारा जागेंवर कुत्र्यांना ह्या रोटी खायला दिल्या जातात.२०१५ ला ‘ रोटला घर’ची निर्मिती झाली असून गावातील महिला सकाळी सात वाजता रोटी बनवून कुत्र्यांना खायला घालतात. गावातील उत्सव दरम्यान कुत्र्यांसाठी खास मिठाई बनवली जाते. आकाश पटेल म्हणाले, रोटी खायला घालण्याचे काम मी दहा वर्षांपासून करतो त्यासाठी मी माझी खास मॉडिफाइड केलेल्या सायकलचा वापर करत दररोज ३०० कुत्र्यांना खायला देतो.हे एक काम आहे जे मी करताना कधीही थकणार नाही असेही आकाश म्हणाले.

अबोला सेवा समितीचे विश्वस्त गोविंद पटेल यांनी सांगितले की ,७ हजार लोकसंख्येच्या गावात माकड,बैल,पक्षी देखील उपलब्ध आहेत.“सुमारे ५०० किलो धान्य हे माकडे, बैल आणि पक्ष्यांसाठी पुरेसे आहे. ट्रस्टतर्फे पक्ष्यांसाठी सुमारे ५०० किलो धान्य दिले जाते. मानवाला नेहमीच त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी असते, परंतु अबोला जपायला हवा,” यामुळे समाज मानवता बनते.अशा प्रकारे पांचोट गावातील कुत्रे रोडपती असूनही करोडपती आहेत.

Exit mobile version