23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषदेशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात डॉ. आंबेडकर यांचे योगदान मोलाचे

देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात डॉ. आंबेडकर यांचे योगदान मोलाचे

राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

जगभरातील लोक भारतीय संविधानाचे  निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी राज्यपाल बैस बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

हेही वाचा..

विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभेचा दिला राजीनामा!

‘प्रणब मुखर्जी म्हणायचे, राहुल गांधी हे अपरिपक्व नेते’

डोंगरावरून ४०० फूट खाली कोसळलेल्या तरुणीची सुटका

दीर्घकाळापासून रचला जात होता, इस्रायलवरील हल्ल्याचा कट!

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान शिक्षणतज्ज्ञ होते, शोषितवर्गाला शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. वंचित व बहुजनांना शिक्षण मिळावे  यासाठी ते सतत कार्य करत राहिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून आजही ते काम सुरू आहे. त्यांनी महिलांच्या अधिकारासाठी कार्य केले आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहत असून याचे कामही लवकरच पूर्ण होईल याचा मला विश्वास आहे, असेही राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितले.

भारतीय राज्यघटना संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार भा  एकनाथ शिंदे यांनी केले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे, अर्थव्यवस्था, ऊर्जा, सिंचन, महिलाधो रण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी केली आणि या धोरणांना मानवतेच्या विचारांची जोड दिली. त्यामुळेच देशाची एकता, बंधुता व एकात्मता या तत्त्वांना बळ मिळाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत – उपमुख्यमंत्री फडणवीस

भारत देश अतिशय वेगाने प्रगती करीत आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला जाते. भारतीय संविधानाने  सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री असताना केलेले काम भारताच्या निर्मितीतील महत्वाचे पाऊल ठरते. इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

देशाची  आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे, या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात समता व बंधुता रुजवण्यासाठी यशस्वी लढा दिला. सर्वोत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती केली. शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ, संरक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचे कार्य अलौकिक आहे. ते  दूरदृष्टीचे प्रशासक होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  सादर केलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रबंधाला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत.ही अभिमानाची गोष्ट आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा