राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवाराच्या विजयाकरिता जेष्ठ नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीची उद्या (१२ नोव्हेंबर) बोरिवलीत महासभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या महासभेचे वक्ता असणार आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्या नुकत्याच सांगली, कोल्हापूरमध्ये सभा पार पडल्या. आपल्या सभेत गृहमंत्री अमित शाह यांनी मविआवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे उद्याच्या पार पडणाऱ्या सभेत गृहमंत्री शाह काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा शंखनाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या फुंकणार आहेत. या महासभेला महायुतीचे उमेदवार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्याय, योगेश सागर, विनोद शेलार, मनिषाताई चौधरी उपस्थित राहणार आहेत. या महासभेला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी खासदार गोपाळ शेट्टी म्हणून विशेष अतिथी म्हणून असणार आहेत. तसेच भाजपा नेते प्रवीण दरेकर, आमदार सुनिल राणे, महिला नेत्या शितल म्हात्रे देखील उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर र्रोजी सायंकाळी ६.३० ही सभा सप्ताह मैदान, कमला विहार स्पोर्टस् समोर, बोरीवली (पश्चिम) या ठिकाणी होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी सर्वांना निमंत्रण पत्रके वाटण्यात आली असून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वांद्रे मधून आशिष शेलार, कांदिवली पूर्व मतदारसंघातून आमदार अतुल भातखळकर, मागाठाण्यातून प्रकाश सुर्वे, बोरीवली मतदारसंघातून संजय उपाध्याय, चारकोपमधून योगेश सागर, मालाड पश्चिम मधून विनोद शेलार, दहिसर मधून मनिषाताई चौधरी उभे आहेत.
हे ही वाचा :
आदिवासी मुलींशी लग्न करणाऱ्या घुसखोरांना आता जमीन मिळणार नाही!
भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरचा मुलगा आर्यन झाला अनया!
संजीव खन्ना यांचे काका ५० वर्षांपूर्वीच होणार होते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य नाययमूर्ती
खलिस्तानी दहशतवादी पन्नूनने राम मंदिरावर हल्ला करण्याची दिली धमकी