24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषड्रोन हल्ल्याच्या भीतीने १८ जानेवारीपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू!

ड्रोन हल्ल्याच्या भीतीने १८ जानेवारीपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू!

पोलीस आयुक्त ग्रेटर मुंबई यांच्याकडून आदेश जारी

Google News Follow

Related

सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत २० डिसेंबर २०२३ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत कलम १४४ लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त ग्रेटर मुंबई यांच्याकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशात म्हटले आहे की, दहशतवादी आणि देशद्रोही घटक हल्ल्यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशात म्हटले आहे की, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात व्हीव्हीआयपींना लक्ष्य केले जाऊ शकते, सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट आणि पॅरा ग्लायडरद्वारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी काही निर्बंध घालणे आवश्यक आहे. असे हल्ले रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय पावले उचलण्याची गरज आहे.२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस आहे यामुळे शहरात प्रचंड प्रमाणात लोक गर्दी करतात तसेच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे.या उत्सवाच्या आगोदर हा आदेश आला आहे.

हे ही वाचा:

आता आम्ही कोणतीही मशीद गमावणार नाही…

१०८ फुटांच्या अगरबत्तीने प्रभू रामाची अयोध्या सुगंधित होणार

तैवानवरून चीन आक्रमक; अमेरिकेला दिला इशारा

भारत सरकारने चार वर्षाखालील मुलांसाठी अँटी-कोल्ड ड्रग कॉम्बिनेशनवर घातली बंदी!

आदेशानुसार, सीआरपीसी च्या कलम १४४ अंतर्गत २० डिसेंबर २०२३ ते १८ जानेवारी २०२४ पर्यंत रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर, पॅरा मोटर्स, हँड ग्लायडर आणि हॉट एअर बलून इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे.मात्र, या काळात मुंबई पोलिसांना हवाई निगराणीतून सूट देण्यात येणार आहे. त्यासाठी उपायुक्तांची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. आदेशात म्हटले आहे की, जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याला आयपीसीच्या कलम १८८ नुसार शिक्षा केली जाईल.

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा