28 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरविशेषलोकसभेतं मविआला ईव्हीएम गारगार वाटलं आणि आता गरम वाटतंय!

लोकसभेतं मविआला ईव्हीएम गारगार वाटलं आणि आता गरम वाटतंय!

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून तुफान फटकेबाजी

Google News Follow

Related

विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा आजचा (९ डिसेंबर) शेवटचा दिवस. आज विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भवनाला संबोधित करत राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांच्या मागच्या अडीच वर्षाचे कामकाजात केलेल्या कामाचा उल्लेख अजित पवार यांनी केला. तसेच विविध विषयांवरून विरोधकांवर टीका करत फटकेबाजीही केली.

विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस मागील दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित आमदारांचा शपथ सोहळा पार पडला. मात्र, शपथविधीच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. यावरून सत्ताधारी नेत्यांनी टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. ते म्हणाले, विरोधकांनी संविधानाच्या तरतुदी एकतर वाचल्या नाहीत, किंवा वाचून ते त्याचे उल्लंघन करत आहेत, असे समजावे लागेल.

संविधानाच्या तरतुदीनुसार, निवडून आलेल्या सदस्यांनी स्थान ग्रहण करायच्या अगोदर शपथ घेणे आवश्यक आहे आणि यावर बहिष्कार म्हणजे तरतुदींचा भंग आहे. याबद्दल मला प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला, यावर मी म्हणालो, आज एक दिवस बसतील, उद्या हे लोक गप गुमाने शपथ घेतली, नाहीतर यांना सभागृहात बसायला मिळणार नाही.

हे ही वाचा : 

‘अमृत’च्या सल्लागार पदी विश्वजीत देशपांडे यांची नियुक्ती

न्यायप्रिय, संयमी व्यक्तिमत्व विधानसभेच्या अध्यक्षपदी लाभल्याचा आनंद

राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड!

मेघालयचे डॉ. विद्यानिष्ठ मारक यांना ‘माय होम इंडिया’कडून ‘वन इंडिया’ पुरस्कार

यावेळी त्यांनी मारकडवाडीचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाला सर्व अधिकार आहेत. विरोधकांनी हे लक्ष्यात घ्यायला हवे कि आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे. आकडेवारीनुसार ४८ टक्के मतदान महायुतीला आहेत आणि ३३ टक्के समोरच्यांना मते आहेत. लोकसभेत मविआच्या जागा जास्त आल्या तेव्हा ईव्हीएम यांना गारगार वाटत होते आणि आता गरम वाटतंय.

महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये पहिल्यांदा २८८ जागा देत असताना २३७ आमदार महायुतीचे निवडून आले. अनेकांच्या लाटा आल्या-गेल्या पण इतके निर्विवादपणे बहुमत कोणाला नव्हते. आता विरोधकांनी मान्य केले पाहिजे, डोळे उघडले पाहिजे, जनताच म्हणेल आता किती दिवस रडीचा डाव खेळत आहेत.

लाडक्या बहिणींनी आम्हाला या ठिकाणी बसवले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. दरम्यान, निवडणुकीच्या कालावधीत अजित पवारांनी परिधान केलेल्या गुलाबी जॅकेटची बरीच चर्चा झाली. यावरून त्यांनी विरोधकांवर फटकेबाजी केली. ते म्हणाले, गुलाबी जॅकेट आज मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याचाही विरोधकांना त्रास आहे का?, आता यांना कलर देखील कळत नाही. २०८ म्हणणारे आता कलर विसरायला लागले आहेत, असा टोला अजित पवारांनी लगावला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा