महाराष्ट्रात ४८.८८ टक्के मतदान, देशात ५६.६६ टक्के!

देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त तर राज्यात दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान

महाराष्ट्रात ४८.८८ टक्के मतदान, देशात ५६.६६ टक्के!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान आज पार पडले.उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा या आठ राज्यांतील ४९ जागांवर मतदान आज पार पडले.या टप्प्यात ६९५ उमेदवार रिंगणात आहेत.संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगाल मध्ये सर्वात जास्त म्हणजे ७३ % टक्के तर सर्वात कमी ४८.६६ % टक्के महाराष्ट्रामध्ये झाले आहे.दरम्यान, देशात एकूण ५६.६६ टक्के मतदान झाले आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या १३ जागांसाठी मतदान पार पडले आहे.यामध्ये मुंबई ईशान्य, कल्याण,ठाणे, दिंडोरी,धुळे, नाशिक,पालघर, भिवंडी,मुंबई दक्षिण,उत्तर मुंबई,मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई उत्तर मध्य,मुंबई दक्षिण मध्य, अशा एकूण १३ जागांसाठी आज मतदान पूर्ण झाले.एकूण २६४ उमेदवार रिंगणात आहेत.राज्यातील आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण ४८.८८ टक्के मतदान झाले. कल्याणमध्ये सर्वात कमी ४१.७० टक्के तर दिंडोरीमध्ये सर्वाधिक ५७.०६ टक्के मतदान झाले आहे.

हे ही वाचा:

पाचव्या टप्प्यात कुणाचा सुपडा साफ होणार?

गावाचा मतदानावर बहिष्कार, राहुल गांधी पोहचतास दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा!

‘मतदान केंद्रावर दिरंगाई हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे’

‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटींचा परदेशी निधी

 

-राज्यातील ५ वाजेपर्यंतची आकडेवारी
मुंबई ईशान्य भागात ४८.६७ टक्के
कल्याणमध्ये ४१.७० टक्के
ठाण्यात ४६.७७ टक्के
दिंडोरीमध्ये ५७.०६ टक्के
धुळ्यात ४८.८१ टक्के
नाशिकमध्ये ५१.१६ टक्के
पालघरमध्ये ५४.३२ टक्के
भिवंडीत ४९.४३ टक्के
मुंबई दक्षिणमध्ये ४४.६३ टक्के
उत्तर मुंबईत ४६.९१ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम ४९.७९ टक्के
मुंबई उत्तर मध्यमध्ये ४७.४६ टक्के
मुंबई दक्षिण मध्यमध्ये ४८.२६ टक्के

८- राज्यांची आकडेवारी
उत्तर प्रदेश-५५. ८० टक्के
बिहार-५२.३५ टक्के
महाराष्ट्र-४८.६६ टक्के
जम्मू-काश्मीर-५४.२१ टक्के
लडाख-६७.१७ टक्के
पश्चिम बंगाल-७३ टक्के
झारखंड-६१.९० टक्के
ओडिशा-६०.५५ टक्के

 

 

Exit mobile version