भाजपा उमेदवार आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ सावनेर, नागपूर येथे आज (१८ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी मविच्या नेत्यांवर टीका करत आशिष देशमुख यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सोयाबीनच्या दराचा उल्लेख केला. काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला सात हजार भाव देवू अशी घोषणा करते, मात्र काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गुलबर्गा जिल्ह्यात सोयाबीनला ३,८०० रुपये इतका भाव आहे, त्याच काय, असा सवाल उपस्थित करत हे सर्व लबाड असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या सभा पार पडल्या असून आजची माझी शेवटची सभा आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार याचा मला अंदाज आला आहे आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस सांगितले.
हे ही वाचा :
उद्धव ठाकरेंसारख्या खाष्ट सासूमुळेचं सगळे शिवसेनेतून बाहेर पडले
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याला अटक!
पाकिस्तानमध्ये दोन हिंदू मुलींच्या मृत्यूवरून आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण चिडले
आपमधून नाराज होऊन बाहेर पडल्यानंतर कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश!
दहशतीत जगण्याचे दिवस गेले असून आता ताठ मानेने जीवन जगण्याचे दिवस आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हटले. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगले हमी देणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. सोयाबीन सहा हजाराचा दर देणार असल्याची आम्ही घोषणा केली. आमच्या घोषणेनंतर काँग्रेस उठली आणि सात हजार भाव देवू अशी घोषणा केली.
काँग्रसने घोषणा करताच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्या गुलबर्गा जिल्ह्यात सोयाबीन भाव किती आहे, याची माहिती आम्ही काढली. तर तिथे सोयाबीनला ३,८०० रुपये इतका भाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये सात हजार म्हणून सांगायचे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, तिकडे जाऊन पहिल्यांदा सात हजाराने खरेदी करून दाखवा. हे सर्व लबाड लोक आहेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.