रामायणाचा संदर्भ देऊन उलगडले भारताच्या उत्थानाचे सार!

परराष्ट्र एस. जयशंकर यांच्या नव्या पुस्तकात चीन-भारत नितीवरही भाष्य

रामायणाचा संदर्भ देऊन उलगडले भारताच्या उत्थानाचे सार!

करोनाच्या साथीत भारताला जगभरात कमी लेखले गेले, मात्र भारताने अन्य देशांच्या तुलनेत अधिक विकासदराची नोंद केली आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. जयशंकर यांनी ‘व्हाय भारत मॅटर्स’ या स्वतःचे पुस्तक प्रकाशित केले. सन २०२४मध्ये जागतिक दृष्टिकोनातून बरीच उलथापालथ होईल, मात्र आव्हानांशी मुकाबला करण्यासाठी भारत राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयशंकर यांनी त्यांच्या पुस्तकात रामायणाचाही संदर्भ दिला आहे. त्यांनी प्रभू राम-लक्ष्मण आणि हनुमानाच्या माध्यमातून भारताच्या उत्थानाचे वर्णन केले आहे. त्यांनी सांगितले की, सन २०२४ खूप अशांत असेल. सन २०२३मधील काही प्रकरणे सन २०२४वरही परिणामकारक ठरतील. यावर्षी भारतही आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला असेल. आपल्याला पाहावे लागेल की आपण कुठे आहोत. आपण राजकीयदृष्ट्या कुठे आहोत. आर्थिकदृष्ट्या कुठे आहोत. या सर्व बाबींवर लक्ष दिले तर समजेल की, आपली क्षमता सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हे ही वाचा:

जम्बो कोविड सेंटर कथित घोटाळयाप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री योगी आणि अयोध्या मंदिर बॉम्ब धमकी प्रकरणी दोघांना अटक!

श्री रामांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांना रोहित पवारांनी सुनावलं

दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे

अमेरिकेबाबत नेहरूंच्या मनात शंका
परराष्ट्रमंत्री पंतप्रधान नेहरू यांच्या दृष्टिकोनाबाबतही जयशंकर यांनी माहिती दिली. त्यांनी सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांना पत्र लिहिले. पत्रात त्यांनी नेहरू यांना सांगितले की, चीनलाच सर्वप्रथम सुरक्षा परिषदेमध्ये स्थान द्या. १९६२मध्ये चीनशी युद्ध झाल्यानंतर नेहरू अमेरिकेकडून मदत घेण्यासाठी कचरत होते. नेहरू हे अमेरिकेबाबत थोडे संकोची होते. नेहरू यांच्या परराष्ट्रनितीबाबतही सरदार पटेल यांनीही सांगितले होते की, आपण अमेरिकेप्रति इतके अविश्वासी का आहोत? आपण अमेरिकेला आपल्या मित्राच्या रूपात पाहिले पाहिजे.

करोनासाथीतून आपण वर आलो
करोनासाथीच्या काळात जी २० आभासी संमेलनादरम्यान विश्व बँकेच्या प्रमुखांनी भारत मोठी समस्या बनू शकेल, अशी शक्यता वर्तवली होती. भारताला करोनाशी झुंझावे लागेल, असे सांगितले होते. परंतु आता पहा, आपण कुठे आहोत. साथीतून यशस्वीपणे बाहेर पडण्याचे मुख्य कारण ७.७ टक्के विकासदरच आहे. करोनासाथीदरम्यान भारताला जगभरातील देशांनी कमी लेखले, मात्र अन्य देशांच्या तुलनेत भारत अधिक चांगल्या विकासदराच्या साथीने करोनातून वर आला आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version