आमीर खानला पंजाबमध्ये कळली ‘नमस्ते’ची ताकत

अमीर खानने केले स्पष्ट

आमीर खानला पंजाबमध्ये कळली ‘नमस्ते’ची ताकत

‘नमस्ते’मध्ये एक विलक्षण ताकत आहे. ति मी स्वतः पंजाबमध्ये अनुभवली असे अभिनेता अमीर खान याने स्पष्ट केले. जेव्हा दंगल चित्रपटाचे शुटींग सुरु होते, तेव्हा आपल्याला हा अनुभव आला, असेही तो म्हणाला. २०१६ मध्ये चित्रपटाच्या शुटींगवेळी पंजाबमधील नागरिकांची नम्रता काय आहे, हे सुद्धा आम्ही अनुभवली.
आधी ‘रंग दे बसंती’ आणि नंतर ‘दंगल’साठी पंजाबमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव सांगताना आमिर खान म्हणाला, “ही गोष्ट माझ्या खूप जवळची आहे. आम्ही ‘रंग दे बसंती’साठी पंजाबमध्ये शूटिंग केले. तो म्हणाला, तुम्हाला विश्वास बसणार नाही मी पहाटे ५ किंवा ६ च्या सुमारास तिथे पोहोचायचो तेव्हा परिसरातील लोक घराबाहेर हात जोडून माझे स्वागत करायला उभे असायचे.

हेही वाचा..

‘परिस्थिती बदलली, आता तुम्ही भारतीय नसलात तर अमेरिकेत सीईओ होऊ शकत नाही’

२०१५पासून आम आदमी पार्टीने जाहिरातींवर केला १५०० कोटी रुपयांचा खर्च

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान छत्तीसगडमधून अटक!

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा!

आमिर खान म्हणाला, मुस्लिम असल्यामुळे ‘नमस्ते’मध्ये हात जोडण्याची सवय नव्हती. मात्र अडीच महिने पंजाबमध्ये घालवल्यानंतर मला ‘नमस्ते’ची शक्ती समजली. ही एक अद्भुत भावना आहे,
कपिल शर्माच्या शोमध्ये आमिर खान पहिल्यांदाच दिसला होता. या भागात त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीतील अनेक किस्से सांगितले.

Exit mobile version