25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषपुण्यात मजार बांधणारे झाले मुजोर, दत्त मंदिराजवळच टाकली चादर!

पुण्यात मजार बांधणारे झाले मुजोर, दत्त मंदिराजवळच टाकली चादर!

हिंदुत्ववाद्यांनी चालवला हातोडा, नानावाडालगतची घटना

Google News Follow

Related

पुण्यातील प्रसिद्ध नानावाडा लगत वसंत सिनेमा येथील पाठीमागील भितींवर काही दिवसांपासून दोन मजार बांधून अनधिकृतपणे अतिक्रमण केले गेले होते. पुण्यातील समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्या ठिकाणी दत्त मंदिर असताना देखील मजार बसविण्यात आली होती. यानंतर आज (६ डिसेंबर) समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून ही मजार हटवण्यात आली.

यावेळी समस्त हिंदु आघाडीच्या वतीने उज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उज्वला गौड म्हणाल्या, एकीकडे देशामध्ये वक्फ बोर्डाचा यक्ष प्रश्न सतावत आहे. आणि या ठिकाणी गल्लोगल्ली, इमारतींच्या भितींमध्ये छोट्या-छोट्या चादरी टाकून मजार उभारून येथील जागा काबीज करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अशाच अनधिकृत तीन मजार वसंत सिनेमाच्या मागे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर समस्त हिंदु आघाडीच्या बांधवानी आज घटनास्थळी दाखल होत मजार उध्वस्त करून टाकल्या. कारण हे लोक ज्याठिकाणी चादरी टाकतात त्याठिकाणाला वक्फ बोर्डाचा दावा ठोकल्याशिवाय राहत नाहीत. वक्फ बोर्डाची मुजोरी आम्ही चालू देणार नाही. इथून पुढे जर असे काही दिसून आले तरी ते उध्वस्त करून टाकू. साधु संतांचा हा हिंदुस्तान आहे, ज्याठिकाणी तुम्ही खोदकाम कराल त्याठिकाणी फक्त ‘शिवलिंग’ सापडेल, असे उज्वला गौड म्हणाल्या.

हे ही वाचा : 

‘आका’ सोरोसला पुरस्कार, कोणाला आठवले यूपीए सरकार ?

टोरेस कंपनीला टाळे; तीन लाख लोकांना ५०० कोटींचा गंडा

ताज हॉटेल बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या, तपासणीत धक्कादायक माहिती उघड!

नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा