प्रदूषणाचा विळखा बसलेल्या मुंबईत दिवाळीत तीन तास फटाके फोडण्याची मुभा

उच्च न्यायालयाचे निर्देश

प्रदूषणाचा विळखा बसलेल्या मुंबईत दिवाळीत तीन तास फटाके फोडण्याची मुभा

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला प्रदूषणाचा विळखा बसला असून सरकारने नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. अशातच मुंबईमध्ये हवेची प्रदूषण पातळीवरील जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले आहेत.

मुंबईतील वाढते प्रदूषण पाहता मुंबई उच्च न्यायालयाने नियमावली जारी केली आहे. दिवाळीमध्ये सायंकाळी सात ते दहा दरम्यानच फटाके फोडावेत. तसेच १० नोव्हेंबर पर्यंत बांधकामाचे डेब्रिज घेऊन जाणारे वाहन तात्पुरती थांबवावीत. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डच्या अतिरिक्त आयुक्तांना जबाबदार धरले जाईल. शुक्रवारी याबाबत केंद्र, राज्य आणि सर्व प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र दाखल करावे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्ता अमर टिके यांची बाजू मांडणारे वकील विवेक बत्रा यांनी केंद्र, राज्य शासन आणि सर्व प्राधिकरण यांच्यावर आरोप केला आहे. ३.७ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा नारा दिला जातो. परंतु, मुंबईत विषारी वायूमुळे जनता मरायला टेकलेली आहे. त्यामुळे न्यायालयाने अत्यंत कडक कारवाईचे आदेश दिले पाहिजे. शासनाच्या वतीने बाजू मांडताना डॉ. बेंद्रे सराफ यांनी शासनाच्या वतीने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच विविध शासकीय बिगर शासकीय सर्व प्राधिकरणांना तसेच बांधकाम करणारा विकासकांना याबाबत नोटिसा दिल्या असल्याची माहिती दिली आहे.

सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांनी आदेश दिले की, राज्याच्या मुख्य सचिवांच्या देखरेखीखाली संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांना जबाबदार धरले जाईल. त्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी आदेशाचे पालन करावे. बांधकामाच्या संदर्भातले डेब्रिज हे तीन दिवस पूर्णपणे नियंत्रणात आणावे.

हे ही वाचा:

रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!

दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

तसेच दिवाळीच्या दरम्यान फक्त सायंकाळी सात ते दहा मध्येच फटाके फोडावे. प्रदूषण करणारे फटाके फोडू नयेत. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डच्या अतिरिक्त आयुक्तांना जबाबदार धरले जाईल. त्यांनी आपापल्या वार्डात आदेशाचे सक्तीने पालन करणे जरुरी आहे.

Exit mobile version