पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायासोबत कशा प्रकारची हीन वर्तणूक केली जाते, याचा दाखला पुन्हा एकदा मिळाला आहे. सिंध प्रांतातील मीठी शहरात एका प्रसिद्ध हिंदू मंदिराला उद्ध्वस्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांचा दावा आहे की, हिंगलाज माता मंदिर जमीनदोस्त करण्यासाठी त्यांना न्यायालयाकडून आदेश मिळाला होता. त्याचेच पालन करण्यात आले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेजवळ शारदा पीठ मंदिराचा एक हिस्साही उद्ध्वस्त केल्याचे समजते.
सर्वोच्च न्यायालयाने हे मंदिर जमीनदोस्त करण्यास स्थगिती दिली होती, तरीही ते उद्ध्वस्त करण्यात आले. या जागी कॉफी हाऊस बनवण्यासाठी ही तोडफोड करण्यात आली आहे. या कॉफी हाऊसचे उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. जुलैमध्ये पाकिस्तानने आणखी एका मंदिराला जुनी आणि धोकादायक बांधकाम म्हणून घोषित केले होते. त्यानंतर कराचीमध्ये सोल्जर बाजारातील माता मंदिरावर बुलडोझर फिरवण्यात आला.
हे ही वाचा:
आता संजय राऊत म्हणतात, इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता!
अंतरावालीत पिस्तुलासह अटक झालेला ऋषीकेश बेदरे कोण?
शालेय आहारात अंडी कशाला? शाकाहारच हवा!
‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!
जुलैमध्ये मरिआता मंदिरावर बुलडोझर
सुमारे १५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले मरिआता मंदिर ४०० ते ५०० चौरस फूट जागेवर विस्तारलेले आहे. त्यामुळे या मंदिराची जमीन हडपण्यासाठी विकासकांचा दीर्घकाळापासून या जागेवर डोळा होता. अखेर हे मंदिर जुलैमध्ये जमीनदोस्त करण्यात आले. कराची हे विभिन्न प्राचीन हिंदू मंदिराचे केंद्र राहिले आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू संस्कृतीचे अस्तित्व याच ठिकाणी टिकून आहे.