24 C
Mumbai
Tuesday, January 28, 2025
घरविशेषकेंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा...

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा!

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत दिले निर्देश

Google News Follow

Related

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहरातील १७८-धारावी, १७९-सायन-कोळीवाडा, १८०-वडाळा, १८१-माहिम आणि १८२-वरळी या पाच विधानसभा मतदारसंघांची केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आज (३० ऑक्टोबर) भेट देऊन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा आढावा घेतला.

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १० विधानसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टीमच्या कामकाजावर खर्च निरीक्षक लक्ष ठेवत आहेत.

हे ही वाचा : 

५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी

मसालाकिंग धनंजय दातार यांच्यातर्फे फुफ्फुस विकारग्रस्तांना प्राणवायू उपकरण संचांची भेट

‘नवाब मलिक यांच्या विरोधात प्रचार करणार’

पूर्व लडाख सीमेवरील डेपसांग, डेमचोक पॉईंट्सवरून लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण

माहीम विधानसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाबद्दल माहिती घेतल्यानंतर विजय बाबू वसंता यांनी वाहन तपासणीसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू आणि शस्त्रसाठा तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक टीमने त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधितांना वेळेत पाठवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने २४ तास तीन शिफ्टमध्ये काम करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे. केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी संदिपान मते उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
226,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा