मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र बुधवारी तुफान पाऊस पडत असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. मालाड परिसरात झाड पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची तसेच विक्रोळी सूर्यनगर येथे एक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.
मालाड परिसरात झाड पडल्याने एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसाळ्यात झाड कोसळून मृत्यू होण्याचे प्रकार सुरू असून बुधवारी पहाटेच्या सुमारास मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळून एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कौशल महेंद्र जोशी वय वर्ष ३३ असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हे ही वाचा:
मुंबईतील दोन सागरी सेतूंना सावरकर, अटलजींचे नाव
वॅगनरनंतर जगभरातील खासगी लष्करी दलांकडे वळले लक्ष
मुंबई महापालिका कोविड घोटाळा: लाईफलाईन कंपनीच्या कागदांवरील डॉक्टर्स अस्तित्वातचं नाहीत!
डॉक्टरांचा सल्ला झुगारून दुखापतग्रस्त ममता बॅनर्जी घरी परतल्या
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे ३५ फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. बुधवारी पहाटे कौशल जोशी चाळीतील शौचालयात गेला असता हे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.
भिंत कोसळली, जीवितहानी नाही
विक्रोळी सूर्यनगर परिसरात एक संरक्षक भिंत कोसळली होती. आता याच परिसरात डोंगराचा काही भाग कोसळला आहे. डोंगराचा काही भाग हा एका घरावर कोसळला आहे यात घरात अडकलेल्या नागरिकांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व स्थानिक पोलिस दाखल झाले होते. भिंत कोसळण्याचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता.