महाराष्ट्रात फक्त देशी गायीलाच राज्यमातेचा दर्जा का?, जर्सी गायीला का नाही?

विलेपार्लेच्या संन्यास आश्रमातील गोशाळेचे गोसेवक धनराज पाटील सांगितले कारण

महाराष्ट्रात फक्त देशी गायीलाच राज्यमातेचा दर्जा का?, जर्सी गायीला का नाही?

महाराष्ट्रात देशी गायीला राज्याच्या मातेचा दर्जा देण्यात आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे राज्यासह देशभरात कौतुक होत आहे. मात्र, केवळ देशी गायीलाच राज्याच्या मातेचा दर्जा का?, जर्सीसारख्या इतर गायींच्या जातींना राज्य मातेचा दर्जा का नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रश्नांवर विलेपार्ले येथील संन्यास आश्रमातील गोशाळेचे गोसेवक धनराज पाटील यांनी उत्तर दिले आहे.

झी न्यूजच्या बातमीनुसार गोसेवक धनराज पाटील म्हणाले, हिंदू धर्मात देशी गाईला पौराणिक महत्त्व आहे. याचे दूध गोड असते, म्हणूनच ते भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले जाते. देशी गायीच्या मुत्राचे सेवन केल्यामुळे अनेक आजारही दूर होतात. या कारणास्तव, बरेच लोक पहाटे आश्रमात येतात आणि देशी गायीचे मूत्र घेवून सेवन करतात. देशी गायीमध्ये ३६ कोटी देवदेवतांचा वास असल्याचे मानले जाते.

हे ही वाचा : 

लाडकी बहीण योजना : सेवा शुल्क कपात केला तर कारवाई

एआयएक्ससीची विमाने एआयएक्स एअर ऑपरेटर प्रमाणपत्रावर हस्तांतरित

रेल्वे अपघात करण्याचा कट रचणाऱ्या दोघांना अटक

अयोध्या बलात्कार प्रकरण : राजू खानचा डीएनए नमुना गर्भाशी जुळला

३० वर्षांपासून गायींची सेवा करणाऱ्या धनराज यांनी देसी आणि जर्सी गायींमधील फरक स्पष्ट करताना सांगितले की, देशी गायींना मोठे कान असतात. मानेचा भाग जास्त खाली लटकलेला असतो, पाठीचा भाग बराच उंच असून शिंगेही मोठी व वक्र असतात.

ते पुढे म्हणाले, जर्सी जातीच्या गायीची शिंगे आणि कान लहान असतात. मानेचा भाग देशी गायी सारखा लटकलेला नसतो आणि पाठीचा भाग देखील एवढा उंच नसतो. पण व्यावसायिकदृष्ट्या बोलायचे झाले तर जर्सी गाय दिवसातून दोनदा एकूण १६ लिटर दूध देते, तर देशी गाय दिवसातून दोनदा फक्त ७-८ लिटर दूध देते. त्यामुळे व्यवसायासाठी लोक जर्सी गायींचे जास्त पालन करतात आणि देशी गायींकडे दुर्लक्ष करतात, असे गोसेवक धनराज पाटील म्हणाले.

ये डर बना रहना चाहिए... | Amit Kale | P M Modi | Mallikarjun Kharge | Jammu Kashmir Elections |

Exit mobile version