के. सी. कॉलेज खेलो इंडिया बास्केटबॉल स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये

शार्प शूटर सिद्धी दळवी ही के. सी. कॉलेजच्या विजयाची शिल्पकार

के. सी. कॉलेज खेलो इंडिया बास्केटबॉल स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये

के. सी. कॉलेजने सर्वोत्तम फॉर्म राखत दुसर्‍या फेरीच्या सामन्यात सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लबचा ४०-३७ असा पराभव करताना अस्मिता खेलो इंडिया १७ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या ’सुपर लीग’मध्ये धडक मारली.

 

विद्याविहार येथील फातिमा हायस्कूल कोर्टवर सुरू असलेल्या लीगमध्ये शार्प शूटर सिद्धी दळवी ही के. सी. कॉलेजच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने १३ नेट करताना कमालीचे सातत्य राखले. निशिता पी. हिने १० गुण, अर्पिता एस. हिने ९ गुण आणि खुशी डी. हिने ६ गुण मिळवत के. सी. कॉलेजला सुपर लीगसाठी पात्र ठरण्यासाठी उपयुक्त योगदान दिले. सेंट अँथनीकडून कार्या पगारे हिने १६ गुण मिळवत छाप पाडली. तिच्यासह गजलक्ष्मी (८ गुण) प्रांजल धुमाळ (७ गुण) यांनी सुरेख खेळ करताना सामन्यात रंगत आणली.

हे ही वाचा:

निपाह व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमधील शैक्षणिक संस्था बंद

गिल खेळला, पण पराभव झाला!

खुशखबर! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

रशियाला मदत करणाऱ्या ३७ कंपन्यांवर अमेरिका आणणार टाच

दुसर्‍या फेरीच्या लढतीत, हूपर्स क्लबने मध्यंतराला १०-२ अशी आघाडी घेत ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलवर १८-५ असा विजय नोंदवला. हूपर्स क्लबकडून आशिया एम. हिने ६ गुण आणि अफझा के. हिने ४ गुण मिळवले. ऑक्झिलियम कॉन्व्हेंटकडून अजिता नाडरने 3 गुण नोंदवले. हूपर क्लबही ‘सुपर लीग’साठी पात्र ठरला आहे.

निकाल – पहिली फेरीडॉमिनिक सॅव्हियो क्लब (उषा आर. ८, अनुष्का के. ७, वेदिका डी. ६) विजयी वि. पीव्हीजी विद्या भवन स्कूल, घाटकोपर (उर्वी एम.६) २९-११ (मध्यंतर: ११-७).
दुसरी फेरीके. सी. कॉलेज (सिद्धी दळवी १३, निशिता १०, अर्पिता एस. ९, खुशी ६) विजयी वि.  सेंट अँथनीज एससी (कार्या पगारे १६, गजलक्ष्मी  ८ प्रांजल धुमाळ ७) ४०-३७ (मध्यंतर २२-१४).
हूपर्स क्लब (आशिया एम. ६, अफझा के. ४) विजयी वि. ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल (अजिथा नाडर 3) १८-५ (मध्यंतर: १०-२).

Exit mobile version