जोगेश्वरीत उबाठा उमेदवार अनंत (बाळा) नर कडून गुंडगिरी, महिलांचा विनयभंग!

शिंदे शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांची कारवाई करण्याची मागणी

जोगेश्वरीत उबाठा उमेदवार अनंत (बाळा) नर कडून गुंडगिरी, महिलांचा विनयभंग!

जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील उबाठा गटाचे उमेदवार अनंत (बाळा) नर यांची मतदार संघात गुंडगिरी सुरू असून मंगळवारी रात्री दोनशे कार्यकर्त्यांसह दगडफेक करून दंगल घडवल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी केला आहे. आज (१३ नोव्हेंबर) मातोश्री क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच त्यांनी उबाठा उमेदवार अनंत नर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे.

रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत. याच मतदार संघात मागील काही दिवसांपासून अनंत नर यांची गुंडगिरी सुरू असून मतदारांना धमकावले जात आहे असा आरोप वायकर यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मंगळवारी (१२ नोव्हेंबर) रात्री अनंत नर हे दीडशे दोनशे कार्यकर्ते घेऊन आले आणि शिवीगाळ केली. त्यांच्या कार्यकर्त्यांने महिलांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. महिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता व्हिडिओ काढणाऱ्यांनी त्या महिलांचे कपडे फाडून महिलांचा विनयभंग केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तसेच मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप खासदार वायकर यांनी केला.

हे ही वाचा : 

कोविडकाळात घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री

मतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका

अनिल देशमुखांना क्लीन चीट नाही; फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न

गौप्यस्फोटांना ऊत… मविआचे सरकार अदानींनी पाडले; पवारांच्या पाठिंब्याने?

ते पुढे म्हणाले,  उबाठा उमेदवार अनंत नर याने सुनेचा छळ केल्याचे व्हिडिओ क्लिप आहेत. घरगुती हिंसा सुनेला जाळण्याचा प्रयत्न, भावाच्या बायकोला घरा बाहेर काढण्याचा प्रयत्न अनंत नर याने केला होता. जोगेश्वरीत अशी गुंडगिरी असेल तर आम्ही निवडणूक लढवू शकत नाहीत. इथे सुरक्षित वातावरण नाही. पोलिस आणि निवडणूक.आयोगाने या घटनेसंदर्भात ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी वायकर यांनी केली. याप्रकरणी अमित पेडणेकर विलास जाधव, मंदार मोरे, बाळा सावंत, संदीप कोठारकर आणि एका अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version