‘रतन टाटा यांना आयुष्यभर देशाचाच विचार’

मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने वाहिली श्रद्धांजली

‘रतन टाटा यांना आयुष्यभर देशाचाच विचार’

भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. रतन टाटांच्या निधनामुळे देशात शोककळा पसरली असून सेलेब्रिटी, क्रिकेटपटू, प्रमुख व्यक्तीसह सामान्य नागरिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच अनेकांनी त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेबाबतही शेअर केले आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने तशीच एक आठवण सांगत श्रद्धांजली वाहिली.

सचिन तेंडूलकर यांनी रतन टाटा यांच्यासोबतचा फोटो ट्वीटकरत म्हणाले, रतन टाटा यांनी आयुष्यभर देशाचाच विचार केला. त्यांचा जाण्याने सर्व देशवासीय शोकाकुल झाले. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचे भाग्य मला लाभले, पण लाखो लोक, जे त्यांना कधीच भेटले नाहीत, त्यांना देखील आज माझ्या एवढेच दु:ख वाटत आहे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे.

हे ही वाचा : 

जैसलमेरमध्ये वक्फ बोर्डाचे अतिक्रमण हटवले

रतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना

‘रतन टाटा यांना भारतरत्न द्या’

‘लाडली बहना योजने’विषयीचे वक्तव्य भोवले; संजय राऊतांवर गुन्हा दाखल

प्राण्यांवरील प्रेमापासून ते परोपकारापर्यंत, त्यांनी हे दाखवून दिले की खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते, जेव्हा आपण अशांची काळजी घेतो, ज्यांच्याकडे स्वतःची काळजी घेण्याचे साधन नाही. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमचा वारसा तुम्ही स्थापन केलेल्या संस्था आणि मूल्यांच्या आधारे कायम पुढे जात राहील, असे सचिन तेंडूलकर यांनी म्हटले.

Exit mobile version