हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. प्रतिभा सिंह या सन २०१९मध्ये येथूनच खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. याच मतदारसंघातून भाजप अभिनेत्री कंगना रनौतलाही मैदानात उतरवू शकते, असे मानले जात आहे.
काँग्रेसचे अनेक मोठमोठे आणि वरिष्ठ नेते लोकसभा निवडणूक २०२४ लढवण्यापासून कचरत आहेत. प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे आधीपासूनच बंडखोरीच्या भूमिकेत आहेत. वीरभद्र सिंहच्या गटातील आमदारांनी बंडखोरी करून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभूत केले होते.
हे ही वाचा:
पाकिस्तानी हवाईहल्ल्याला तालिबानचे सडेतोड प्रत्युत्तर!
मोफत काम करण्यास नकार दिल्याने मजुरांच्या झोपड्या पेटवल्या!
तामिळनाडूत पीएमकेची ‘एनडीए’ला साथ; भाजपासोबत युती करून जागावाटप निश्चित
पोलीस दलाची मोठी कामगिरी; गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
विक्रमादित्य सिंह यांच्या गटाच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे लागल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराच्या ऐवजी भाजपच्या उमेदवाराला जिंकून देणारे आमदारही त्यांचेच निष्ठावान मानले जात आहेत.हिमाचल प्रदेशच नव्हे तर अन्य राज्यांतही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना नेत्यांनी एकजुटीने काम करणे अपेक्षित असताना येथे पक्षामध्येच अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत.
हिमाचलमधीलच आणखी एक माजी खासदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये ज्याला त्याला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हवी असल्याने काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. ऑपरेशन कमळचा तर हा परिणाम नाही ना, अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.