उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा राज्यासह देशभरात चर्चेत आहे. मुख्यमंत्री योगींचा हा नारा एका पट्ठ्याने आपल्या लग्न पत्रिकेवर छापल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, ‘बटेंगे तो कटेंगे’च्या संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही फोटो लग्न पत्रिकेवर छापण्यात आले आहेत.
गुजरातच्या भावनगरमधील ही घटना आहे. हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी लग्न पत्रिकेवर ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा लिहिण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. २३ नोव्हेंबर रोजी भावनगर जिल्ह्यातील महुवा तालुक्यातील वांगर गावात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. रबारी समाजातील हरेश सेलाना आणि आशा यांचा विवाह होणार आहे.
हे ही वाचा :
राम मंदिराला विरोध, वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे बसलेत
मॉब लिंचिंग झाले नसल्याच्या दाव्यानंतर आदित्य ठाकरेंवर समाजमाध्यमात टीकेचा भडीमार
सुन लो ओवैसी…संभाजीनगरचे नाव औरंगाबाद करणारा अजून जन्माला यायचा आहे!
लाडक्या बहिणींना प्रतिवर्षी २५ हजार २०० रु., कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ; भाजपचा संकल्प
लग्न पत्रिकेच्या पहिल्या पानावर अयोध्येतील प्रभू श्री रामाचे चित्र आहे. तर शेवटच्या पानावर घोषणासोबत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचा फोटो आहे. हरेश सेलाना यांच्या लग्न पत्रिकेची संपूर्ण भागात जोरदार चर्चा आहे. सोशल मिडियावरही लग्न पत्रिका व्हायरल होत आहे. वराचा भाऊ परेशभाई सेलाना यांनी ही लग्न पत्रिका छापली आहे.
परेशभाई सेलाना म्हणाले की, आमच्या घरी लग्न आहे. आम्ही पंतप्रधान मोदीजी आणि योगीजींचा फोटो ‘बटेंगे तो कटेंगे’ या संदेशासह छापले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगीजींचे जे स्वप्न आहे ते सत्यात उतरवण्यासाठी आणि समाजात जागृती निर्माण होण्यासाठी हा संदेश लिहिला असल्याचे त्यांनी सांगितले.