आणि व्हिलारेयाल विजयी झाला…

आणि व्हिलारेयाल विजयी झाला…
युएफा युरोपा लीगचा अंतिम सामना, जवळपास ९५०० प्रेक्षकांची उपस्तिथी . मँचेस्टर युनाइटेड आणि व्हिलारेयाल हे दोन्ही संघ खूप मोठ्या काळानंतर पहिल्यांदाच युरोपियन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामना खेळत होते. मँचेस्टर युनाइटेड हा ऑन पेपर बलाढ्य संघ वाटत होता परंतु सामना सुरु झाला आणि व्हिलारेयालने बढत मिळवली पण १-० ची परिस्थिती मँचेस्टर युनाइटेडने १-१ अशी केली, सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला आणि मग जे काही झालं ते ना भूतो ना भविष्यती असच म्हणावं लागेल.

संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजला असताना फुटबॉलचे सामने देखील प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये खेळवले जात होते पण युएफा युरो लीगचा हा अंतिम सामना मर्यादित प्रेक्षकांच्या  उपस्थितीमध्ये खेळवला गेला आणि ज्यांनी हा सामना स्टेडियममधे जाऊन पाहिला त्यांचे खरंच सार्थक झाले कारण अत्यंत चुरशीचा असा हा सामना पेनल्टी शूटआऊट पर्यंत पोहचला आणि पुढे जे काही झाले त्याने सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले.

युरोपीयन क्लब्ससाठी दोन अत्यंत महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या लीग्स आहेत आणि त्या म्हणजे युएफा चॅम्पियन्स लीग आणि युएफा युरो लीग. ३० युरोपियन देशांमधील ३७ देशांतर्गत लीग्समधील सुमारे ८०० ते ९०० क्लब्स हे २ लीग्समधे प्रवेश करण्यासाठी लढत असतात. जे संघ युएफा चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरत नाहीत ते युएफा युरो लीगसाठी प्रयत्न करतात आणि या दोन्ही लीग्स जगात अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि प्रेक्षक वर्गही खूप मोठ्या प्रमाणात या लीग्स पाहत असतो. याच युएफा युरो लीगचा अंतिम सामना हा इंग्लिश क्लब मँचेस्टर युनाइटेड आणि स्पॅनिश क्लब व्हिलारेयाल यांच्यामध्ये झाला आणि व्हिलारेयाल संघ हा विजयी ठरला.

एकूण ४८ संघ या लीगसाठी पात्र ठरले होते आणि त्यातून मँचेस्टर युनाइटेड आणि व्हिलारेयाल हे २ संघ अंतिम फेरीत दाखल झाले. मँचेस्टर युनाइटेडचा इतिहास पाहता हाच संघ ताकदीचा आहे आणि मँचेस्टर युनाइटेडच हा अंतिम सामना जिंकेल असे बऱ्याच फुटबॉल जाणकारांना आणि फुटबॉल प्रेमींना वाटत होतं. सामना सुरु झाला आणि सामन्याच्या २९व्या मिनिटातच व्हिलारेयालकडून जेराड मॉरेनो याने गोल केला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. सामन्याचा फर्स्ट हाफ् संपला त्यावेळी १-० अशी व्हिलारेयालकडे बढत होती मात्र ही बढत त्यांना फार काळ टिकवून ठेवता आली नाही कारण सेकंड हाफ् सुरु होऊन ५५व्या मिनिटात एडिसन कवानी याने १-१ अश्या बरोबरीत सामना आणला आणि मँचेस्टर युनाइटेडच्या विजयाच्या आशा पुन्हा जाग्या केल्या.

हे ही वाचा:

पुण्यात होम आयसोलेशनवर बंदी नाही

ग्लोबल टेंडरिंगला ‘मराठी’त प्रतिसाद नाही, ‘हिंदी’त आहे

३८ वर्षांनी कल्याणकर घेणार मोकळा श्वास

अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का?

पण खरी चुरस तर अजून बाकीच होती कारण दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अत्यंत चांगली कामगिरी करत कोणालाही गोल करू दिला नाही आणि सामना पेनल्टी शूटआऊटमधे गेला. पण हा पेनल्टी शूटआऊट एक मॅरेथॉन पेनल्टी शूटआऊट कारण ११-१० अश्या फरकाने व्हिलारेयाल पेनल्टी शूटआऊट जिंकले आणि सामनाही. याआधी फुटबॉल इतिहास फक्त ५ वेळा मॅरेथॉन पेनल्टी शूटआऊट झाले आहेत, याचे सगळ्यात ताजं उदाहरण द्यायचे झाले तर २०१४ साली लिव्हरपूल आणि मिडेलसब्रो या संघांमध्ये १४-१३ असे पेनल्टी शूटआउट्स झाले होते. व्हिलारेयालकडून दुसरं आकर्षण ठरलं ते म्हणजे त्यांचा गोलकिपर जेरॉनीमो रुली. रुलीने आधी पेनल्टी घेतली आणि गोल केला आणि आपल्या संघाला बढत मिळवून दिली. लगेचच मँचेस्टर युनाइटेडची पुढची पेनल्टी सेव्ह देखील केली आणि व्हिलारेयालला सामना जिंकवून दिला.

ऑले गनर सॉल्सजर हे मँचेस्टर युनाइटेडचे मॅनेजर झाल्यापासून मँचेस्टर युनाइटेड प्रथमच कोणत्याही लीगचा अंतिम सामना खेळत होता आणि व्हिलारेयाल संघाचे मॅनेजर उनाई एमरी यांना इंग्लिश क्लब आर्सनलने खराब कामगिरीमुळे २०१९ मध्ये काढून टाकले होते आणि जुलै २०२० मधे व्हिलारेयालने त्यांना मॅनेजर म्हणून संधी दिली आणि त्या संधीचे सोने त्यांनी करून दाखवले. दोन्ही मॅनेजर्सनी महत्वाच्या ठिकाणी महत्वाचे सल्ले खेळाडूंना दिले, महत्वाचे सब्स्टीट्युशन्स केले पण अखेर उनाई एमरी यांची रणनीती वरचढ ठरत व्हिलारेयालने युएफा युरो लीगचा अंतिम सामना जिंकत प्रथमच कोणतीही युरोपियन फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.

Exit mobile version