इजिप्तच्या दक्षिणेकडील मिनिया प्रांतात नवीन चर्चच्या बांधकामावरून स्थानिक इस्लामवाद्यांनी स्थानिक ख्रिश्चनांच्या हजारो घरांना आग लावल्याची घटना घडली. २३ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. कॉप्टिक ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुसरण करणारी ही कुटुंबे आहेत. स्थानिक इस्लामवाद्यांनी अलीकडेच कॉप्टिक समुदायाला नवीन चर्च उभारण्यास मान्यता मिळाल्यावर त्याला विरोध करण्याची भूमिका घेतलेली होती.
याबद्दल एकाने माहिती दिली की, अल-फवाखेर गावात नवीन चर्च बांधण्याच्या प्रयत्नातून हे हल्ले घडवून आणले गेले असे मानले जाते. या जाळपोळीमध्ये अनेक घरात लोक असताना घरे जाळून टाकण्यात आली. समाज माध्यमात जळत्या घरांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
हेही वाचा..
शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?
छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांसोबत चकमक, ७ माओवादी ठार!
नाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!
केनियामध्ये धरण फुटून ४० हून अधिक व्यक्तींचा मृत्यू
कॉप्ट्स युनायटेड या वकिलांच्या गटाच्या म्हणण्यानुसार, “अत्यंतवाद्यांनी कॉप्टिक घरांवर दगडे टाकून हल्ला केला. यावेळी घरातील महिला, लहान मुले आरडाओरड करत असताना घरांना आग लावली. विशेष म्हणजे हे हल्ले होत असताना सुरक्षा यंत्रणा बराच वेळ घटनास्थळी पोहोचल्या नाहीत. कॉप्टिक बिशप आन्बा मॅकेरियस यांनी २४ एप्रिल रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा दल आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आणि भडकावणाऱ्यांना अटक केली. सध्या गावात शांतता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ख्रिश्चन घरे जाळणे हे इजिप्तमधील अल्पसंख्याक कॉप्टिक ख्रिश्चनांवर सांप्रदायिक हिंसाचाराचे नवीन उदाहरण आहे. त्यांचा येथे छळ केला गेला आणि कायद्याच्या चौकटीतही त्यांच्यावर अन्याय केला गेला.
कॉप्ट्स युनायटेडच्या म्हणण्यानुसार, चर्चच्या बांधकामावर असाच हल्ला शुक्रवारी दुसऱ्या गावात झाला. इजिप्तच्या सरकारवर १११ दशलक्ष लोकसंख्येच्या देशात ख्रिश्चनांची संख्या कमी लेखल्याचा आरोप आहे.