दिल्लीतून आता तळीरामांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, दिल्ली सरकारने आपल्या नवीन धोरणांतर्गत ड्राय डे ची संख्या कमी केली आहे. आतापर्यंत वर्षभरात २१ वेळा ड्राय डे असायचा. आता २१ वरून फक्त तीन दिवस हे ड्राय डे असतील.
नवीन आदेशानुसार, शहरातील परवानाधारक बार आणि पब केवळ २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आणि २ ऑक्टोबर गांधी जयंतीला बंद राहतील. एल-१५ परवाना असलेल्या हॉटेल्सच्या बाबतीत ड्राय डेजवर मद्यविक्रीवरील निर्बंध रहिवाशांना अल्कोहोल सेवा लागू होणार नाहीत, असे उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशात म्हटले आहे. पूर्वी, २१ ड्राय डेमध्ये महान नेत्यांच्या जयंती आणि धार्मिक सणांचा समावेश होता.
हॉटेल आणि दुकानांवर कोणते नियम लागू होणार?
दिल्ली उत्पादन शुक्ल नियम २०१० च्या तरतुदीनुसार, २०२२ मध्ये २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि २ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली जाणार नाही. मात्र एल -१५ च्या परवाना असलेल्या हॉटेल चालकांना ड्राय दे मध्ये त्यांच्या अतिथींना त्यांच्या खोलीत दारू देऊ शकणार आहेत. तसेच या तीन ड्राय डे व्यतिरिक्त सरकार वर्षातील कोणताही दिवस वेळोवेळी ड्राय डे म्हणून घोषित करू शकते. असे आदेशात म्हटले आहे.
गेल्यावर्षी पर्यंत दिल्लीमध्ये होळी, दिवाळी , जन्मष्टमी , मोहरम , बकरी-ईद , गुडफ्रायडे ,रामनवमी, बुद्धपूर्णिमा, महावीर जयंती, महर्षी वाल्मिकी जयंती, गुरुनानक जयंती, दसरा आणि इतर सण ड्राय डे म्हणून पाळले जात होते.