बिहारमध्ये उष्म्याने कहर केला असून गेल्या २४ तासांत उष्माघाताने ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २००हून अधिक जण रुग्णालयात दाखल आहेत. वाढत्या उष्म्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
बिहारमधील रुग्णालयात गेल्या २४ तासांत उष्माघाताने ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १९ जणांचा मृत्यू एनएमसीएच आणि १६ जणांचा मृत्यू पीएमसीएचमध्ये झाला. इतकेच नव्हे तर, या दरम्यान पीएमसीएचमध्ये १०५ तर, एनएमसीएचमध्ये ११०जण उष्माघात आणि अन्य आजारांमुळे दाखल आहेत. एनएमसीएचच्या औषधोपचार विभागाचे उपअधीक्षक डॉ. अजयकुमार सिन्हा यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
‘एनएमसीएचमध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या १६ जणांचा मृत्यू त्यांच्यावर उपचार सुरू होण्याआधीच झाला. तर, तिघांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक असतानाच ते रुग्णालयात पोहोचले होते. त्यांचा मृत्यू अतिउष्म्यामुळे उलटी, कमी रक्तदाब, खूप ताप आणि डोकेदुखी यांसारख्या आजारांनी झाला,’ असे ते म्हणाले. तर, ‘उष्म्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. चिंताजनक प्रकृती असणाऱ्या रुग्णांचा मृत्यूही होत आहे. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती स्थिर होणाऱ्या रुग्णांना सामान्य वॉर्डांमध्ये दाखल केले जात आहे,’ असे पीएसीएचचे आपत्कालीन विभागाचे प्रभारी डॉ. एम सरफराज यांनी सांगितले.
हे ही वाचा:
केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत
१८० देशांमधील व्यक्तींसमोर मोदी करणार योग
मणिपूर अजूनही धुमसतेच, १० हजारांहून अधिक घरे पेटली
गुजरात दंगल : मिडीयाच्या दबावात हिंदूना गोवले
पीएमसीएसच्या औषधोपचार विभागाचे वरिष्ठ चिकित्सक डॉ. पी. एन. झा यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी आठ ते दुपारी एक म्हणजे अवघ्या सहा तासांत १६ जणांचा उष्माघाताशी संबंधित आजारांनी मृत्यू झाला. अनेक रुग्णांना कमी रक्तदाब, खूप ताप आणि डोकेदुखी, उलटीचा त्रास होत होता, अशी माहिती त्यांनी दिली.