रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक घरी देणार निमंत्रण!

'गृह संपर्क अभियानातून' स्वयंसेवक देणार निमंत्रण

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक घरी देणार निमंत्रण!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अयोध्येतील प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्याच्या उपस्थितीसाठी १ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबवणार आहे. देशभरातील २५ कोटी कुटुंबांपर्यंत संघाचे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन अयोध्येच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्रिका देणार आहेत.स्वयंसेवक प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन अक्षता ( तांदूळ) वाटणार आहेत.’गृह संपर्क अभियान’ या मोहिमेतून प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्या पूर्वी स्वयंसेवक घरोघरी जाऊन तांदूळ वाटून निमंत्रण देणार आहेत.

प्रत्येक घराला अभिषेक समारंभाशी जोडणे आणि लोकांना त्यांच्या घरातून, मंदिरातून हा सोहळा साजरा करण्यास सांगणे आणि अयोध्येला भेट देणे हे ‘गृह संपर्क अभियाना’चे उद्दिष्ट आहे.

स्वयंसेवकां’नुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर ७,००० मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा अभिषेक सोहळा संघ परिवारासाठी सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे.कार्यक्रमाची तीव्रता लक्षात घेऊन, आरएसएसने विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मजदूर संघ , भारतीय जनता पार्टी आणि विद्या भारती यासह सर्व ३६ शाखांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र केले आहे.

हे ही वाचा:

भाषण देत असतानाच आयआयटी कानपूरचा प्राध्यापक कोसळला

प्रियांका वड्रा, सचिन पायलट यांना बदलले!

मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार, एकाचा मृत्यू!

जय श्रीराम : प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे रचनाकार सोमपुरा कुटुंबीय

 

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक हिंदूंच्या घरी अक्षत( तांदूळ) पोहचवण्याची तयारी सुरु झाली आहे.अयोध्येतून आणलेले कलश प्रमुख मंदिरांमध्ये पोहोचवले जात आहेत. येथून स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्या ठरविल्या जात आहेत. याशिवाय २२ जानेवारी रोजी गल्लीतली व परिसरातील प्रत्येक मंदिरात शुभकार्यक्रम करण्याची तयारी सुरु आहे.मंदिरे सजवण्याचीही तयारी सुरु करण्यात आली आहे. मंदिरात भजन वैगैरे होणार आहे मात्र मिरवणूक होणार नाही.या मोहिमेदरम्यान २५ कोटी कुटुंबांना कव्हर करण्याचे उद्दिष्ट संघ परिवाराने ठेवले आहे, ते पुढे म्हणाले.आरएसएसच्या आणखी एका कार्यकर्त्याने सांगितले की २२ जानेवारीला अभिषेक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणारे एलईडी स्क्रीन देखील लोकांसाठी लावले जाणार आहेत.

 

Exit mobile version