बांग्लादेशात हिंदूंच्या नोकऱ्यांवर डोळा, घरे-मंदिरावरील हल्ल्यानंतर जबरदस्तीने मागताहेत राजीनामे !

अजूनही काही ठिकाणी हिंदूंवर होत आहेत हल्ले

बांग्लादेशात हिंदूंच्या नोकऱ्यांवर डोळा, घरे-मंदिरावरील हल्ल्यानंतर जबरदस्तीने मागताहेत राजीनामे !

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी देश सोडल्यानंतर अल्पसंख्यांकांवर विशेषतः हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हल्ल्यांमध्ये अनेक हिंदूंना आपले प्राण गमवावे लागले. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या अंतर्गत गेल्या आठवड्यात हिंदू घरांवरील आणि मंदिरावरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय घट झाली असली तरी, अजूनही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना अजूनही नोंदवल्या जात आहेत. दरम्यान, आता हिंदूंच्या सरकारी नोकऱ्यांना हिंसाचार करणाऱ्यांनी लक्ष्य केले असून अनेक लोकांकडून जबरदस्तीने राजीनामे घेतले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हिंदू समाज चिंतेत आहे. बांग्लादेशात हिंदूं अल्पसंख्यांक असून त्यांची लोकसंख्या ८ टक्के इतकी आहे.

५ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या हिंसाचारात हिंदूंना टार्गेट करून त्यांची घरे, मंदिरे पाडण्यात आली आहेत. हिंदूंच्या घरांमध्ये शिरकाव करत सोने-दागिन्यांची चोरी, मारहाण अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडली. इतकेच नाहीतर अनेक हिंदूंची हत्या देखील करण्यात आली. दिनाजपूरमध्ये हिंदूंच्या मालकीच्या सुमारे ४० दुकानांची तोडफोड करण्यात आली. अजूनही काही ठिकाणी हिंदूंवर हल्ले होत असल्याची माहिती आहे. काही हिंदूंवर हसीना शेख यांच्या आवामी लीग पक्षाशी संबंध असल्याने त्यांच्यावर हल्ले होत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा :

सत्तापालटानंतर बांगलादेश पुन्हा रुळावर, शाळा-महाविद्यालये उघडण्याचे आदेश !

विमानातून ज्वलनशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशासह पाच जणांना बेड्या

स्थलांतर कसलं ? हिंदुना त्रास देणाऱ्यांचे ग्रहांतर करा !

मनोज जरांगेंच्या रॅलीत ५ लाख नव्हेत ८ हजार लोक !

 

बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन ऐक्य परिषदेचे सरचिटणीस राणा दासगुप्ता म्हणाले की, आम्ही चांगल्या स्थितीत नसून आमच्या चिंता अद्याप संपलेल्या नाहीत. ते पुढे म्हणाले, अल्पसंख्यांकांच्या सदस्यांना सरकारी कार्यालये, महाविद्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधून राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. जबरदस्तीने राजीनामा देण्याची प्रक्रिया शनिवार पासून सुरु झाली असून अजूनही काही ठिकाणी शाळा, विद्यापीठे आणि महापालिकांमध्ये सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version