बदलापूरमध्ये ‘चादर गँग’चा धुमाकूळ, टायटनचं शोरूम फोडलं !

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु

बदलापूरमध्ये ‘चादर गँग’चा धुमाकूळ, टायटनचं शोरूम फोडलं !

बदलापूरमध्ये ‘चादर गँग’ने धुमाकूळ घातला आहे. टायटनचे शोरूम फोडून मोठ्या किमतीची घड्याळे चोरांनी लंपास केली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून शोध सुरु झाला आहे.

बदलापूरमधील टायटनचे शोरूम फोडून चादर गँगने तब्बल २५ लाख रुपये किमतीची घड्याळे चोरून नेली आहेत. चोरीची समोरून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ‘राजेश वॉच’ नावाच्या शोरूममध्ये चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

तर इम्तियाज जलील यांचे कोल्हापुरी पायताणाने स्वागत केले जाईल….

यूपीएससी नापास, तरीही परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव… ज्योती मिश्राची चक्रावून टाकणारी कहाणी

उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; दिब्रूगड एक्स्प्रेसचे १० डबे घसरले

जगातील लोकसंख्येला मुस्लिम जबाबदार, भारतातही तीच परिस्थिती !

दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी व्यापारांनी पोलिसांकडे केली आहे.

नाव सांगायला लाज का वाटते? | Dinesh Kanji | Yogi Adityanath | Kanwar Yatra 2024 |

Exit mobile version