एशियन पॅरा गेम्समध्येही भारत ‘अबकी बार १०० की पार’

भारताच्या खात्यात १११ पदके

एशियन पॅरा गेम्समध्येही भारत ‘अबकी बार १०० की पार’

भारतीय पॅरा ऍथलिट्सनी क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केली असून चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये नवा इतिहास रचला आहे. भारताने या स्पर्धेच्या अंती विक्रमी संख्येची पदके आपल्या खात्यात जमा केली आहेत. या स्पर्धेत भारताने १११ पदके भारताच्या नावे केली आहेत. भारताने एखाद्या मोठ्या स्पर्धेत केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

भारताच्या खात्यात १११ पदके आली असून त्यातील भारताने २९ पदके सुवर्ण आहेत तर, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदके आहेत. हांगझू येथील एशियन पॅरा गेम्समध्ये चीनने सर्वाधिक म्हणजेच ५२१ पदके जिंकली. त्यांनी २१४ सुवर्ण, १६७ रौप्य आणि १४० कांस्य पदके जिंकली आहेत. तर, इराण १३१ पदकांसह पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. इराणच्या खात्यात ४४ सुवर्ण, ४६ रौप्य आणि ४१ कांस्य पदके आहेत. जपानने ४२ सुवर्ण, ४९ रौप्य आणि ५९ कांस्य पदके जिंकली आहेत. कोरियाने ३० सुवर्ण, ३३ रौप्य आणि ४० कांस्य पदके जिंकली आहेत.

यापूर्वी झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताने १०७ पदके जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र, एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी हा माईल स्टोन देखील मागे टाकला. भारत पदक तालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या एशियन पॅरा गेम्समध्ये २०१० साली भारताने १४ पदके जिंकली होती.

हे ही वाचा:

‘आमचा संताप गाझाला आता कळेल’

गाझामधील युद्धविरामाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यास भारताचा नकार

मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला

ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय पॅरालम्पिक समितीचे अध्यक्ष दीपा मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “आम्ही इतिहास रचला आहे. आमच्या पॅरा अॅथलिट्सनी देशाचा गौरव वाढवला आहे. आता पॅरिस पॅरालम्पिकमध्ये टोकियोपेक्षा जास्त पदके जिंकणार. आमच्या या कामगिरीमुळे आश्चर्यचकीत झालेलो नाही. आम्हाला ११० ते ११५ पदके मिळण्याची अपेक्षा होतीच १११ हा शुभ आकडा आहे.”

Exit mobile version