राहुल गांधी म्हणजे ‘फ्यूज ट्यूबलाइट’, मेड इन चाइना!

भाजपकडून राहुल गांधींचे पोस्टर जारी

राहुल गांधी म्हणजे ‘फ्यूज ट्यूबलाइट’, मेड इन चाइना!

भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहे. दरम्यान, भाजपने पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. भाजपच्या एक्स हँडलवरून एक पोस्टर जारी करण्यात आले आहे. यामध्ये भाजपने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे ‘फ्यूज ट्यूबलाइट’ असे वर्णन केले आहे. पोस्टरमध्ये वरच्या कोपऱ्यात ‘काँग्रेस प्रेझेंट्स’ लिहिलेले आहे, तर त्याच्या पाठोपाठ ‘मेड इन चायना’ असेही लिहिले आहे. शेवटी भाजपने पुन्हा एकदा मोठ्या अक्षरात ‘राहुल गांधी इन आणि ट्यूबलाइट’ असे लिहून वादविवादाचा नवा स्तर गाठला आहे.

सलमान खानच्या चित्रपट ट्यूबलाइटच्या पोस्टरनुसार हे पोस्टर डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये सलमान खानच्या जागी राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला आहे. यासोबतच भाजपने पोस्टरमध्ये ‘काँग्रेस प्रेझेंट्स, मेड इन चायना, राहुल गांधी एंड एज ट्यूबलाइटमध्ये’ असं म्हटलं आहे. याआधीही भाजप आणि काँग्रेसमध्ये असे वाद झालेले आहेत.

हे ही वाचा:

प्रेषित मोहम्मदाचा अवमान? इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा बस कंडक्टरवर चाकूहल्ला

अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले

गाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!

नुकतेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना ‘पनवती’ आणि  ‘पाकीटमार’ अशी अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली होती.त्यानंतर निवडणूक आयोगाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावत २५ नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. याआधीही राहुल गांधींना त्यांच्या भाषणबाजीमुळे संसद सदस्यत्व गमवावे लागले असून पुन्हा एकदा राहुल गांधींना धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, २०२० च्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाषण चालू असताना राहुल गांधी हस्तक्षेप करण्यासाठी उठले असता पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींची तुलना ट्यूबलाइटशी करत टीका केली होती.पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी गेल्या ३०-४० मिनिटांपासून बोलत होतो पण तिथे करंट पोहोचायला एवढा वेळ लागला. अनेक ट्यूबलाइट्स अशा असतात,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

 

Exit mobile version