पहाटे झालेल्या हल्ल्यात बिबट्याने घेतला चिमुरडीचा बळी

बिबट्याच्या हल्ल्याने १६ महिन्याची मुलगी दगवली

पहाटे झालेल्या हल्ल्यात बिबट्याने घेतला चिमुरडीचा बळी

गोरेगावच्या पश्चिमेस आरे कॉलनी येथे सोमवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका चिमुरडीचा मृत्यू झाला. इटिका लोट असे या चिमुरडीचे नाव असून अवघी १६ महिन्याच्या या चिमुरडीच्या मानेवर बिबट्याने गंभीर दुखापत केली. तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचाराअंती या चिमुरडीचा मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरात या भागात बिबट्याने हल्ला करण्याची ही तिसरी वेळ आहे, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी सांगितले.

सुमारे तीन आठवड्यांपूर्वी, एक ९ वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांसोबत नवरात्रीमध्ये दांडिया कार्यक्रमासाठी जात असताना जखमी झाला होता. दुसऱ्या प्रकरणात, बिबट्याने स्थिर मोटारसायकलचे सीट कव्हर फाडले होते. असेच आताच्या या हल्ल्यात, मुलीची आई शिव मंदिरात दिवाळी निमित्त प्रार्थना करण्यासाठी पहाटे ५ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास घराबाहेर बाहेर पडली होती. असे स्थानिक रहिवासी जितेंद्र वळवी यांनी सांगितले.

बिबट्याने चिमुरडीवर हल्ला करताच आईचे लक्ष चिमुरडीकडे गेले. भेदरलेल्या आईने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. ठिपकेदार बिबळ्या हिरव्यागार गवतातून पसार झाला. मात्र त्याच्या जबड्यात चिमुकलीचे शरीर तसेच अडकून होते. आईच्या किंचाळण्याने सावध झालेल्या लोकांनी बाहेर धाव घेतली आणि बाळाचा शोध सुरू केला. बिबट्याने जबड्यात पकडल्यामुळे चिमुरडीच्या पाठीला मोठ्या स्वरूपात जखम झाली होती. उपचारासाठी इतिकाला रुग्णालयात दाखल केले असता. तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा हल्ला न्यूझीलंड वसतिगृहाजवळील युनिट क्रमांक १५ च्या जवळ झाला. अशी माहिती स्थानिक रहिवासी वळवी यांनी दिले.

हे ही वाचा:

हरवलेल्या सामानासाठी आता शुल्क भरण्याचा ‘बेस्ट’ उपाय

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

आरे उद्यान प्रशासनाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरात १२ कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत. वन विभागाचे कर्मचारी परिसरातील लोकांना सावध करीत असतात. तसेच वन विभाग या परिसरात कॅमेरा ट्रॅपची संख्या वाढवणार आहे. अशी माहिती मल्लिकार्जुन यांनी दिली. या परिसरात आधीच चार कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते, परंतु सोमवारचा हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला नाही. तसेच आरेमध्ये सुमारे १० बिबट्या आहेत. स्थानिक परिसरात कचरा कुंड्याभोवती अस्वचछता आणि काचऱ्याभोवती कुत्र्यांचा वावर त्यामुळे शिकारीसाठी बिबट्यांचा वावर स्थानिक परिसरात वाढीस लागला आहे.

Exit mobile version