तो खूप दिवसांपासून आजारी होता उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले होते, त्याची तब्येत सतत खालावत होती डॉक्टरांनी त्याची नाडी तपासली आणि त्याला मृत घोषित केले. घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली. ‘राम नाम सत्य है…’ म्हणत त्याचे पार्थिव तिरडीवर घेऊन स्मशानाकडे सर्व जात होते. अचानक तिरडी हलू लागली. हे पाहून घाबरलेल्या लोकांनी तिरडी घेऊन जवळच्या मंदिरात गेले. तेथे जमिनीवर तिरडी ठेवली. आणि अचानक तिरडीवरचा तरुण उठून बसला. या प्रकाराने अंत्ययात्रेतील सर्वांनाच धक्का बसला. हा प्रकार अकोल्यात घडला.
महाराष्ट्रातील अकोल्यात घडला.
अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील विवरा गावात बुधवारी ही घटना घडली. प्रशांत मेसरे असे या तिरडीवरून उठणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत मेसरे काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चांदणी पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून कार्यरत होता. वयाच्या २५ व्या वर्षी मृत्यू झाल्याच्या वृत्ताने घरच्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. तिरडीवरून जात असताना अचानक त्याच्या शरीरात हालचाली सुरू झाल्या. गावकऱ्यांना काही समजले नाही. घाबरून ते जवळच्या गावातील मंदिरात पोहोचले. तिरडी जमिनीवर ठेवताच तो उठून बसला.
हे ही वाचा:
चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले
शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा
प्रशांतचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी देखील मिस यू प्रशांत असे लिहून मोबाईलवर स्टेट्स ठेवले होते. पण प्रशांत जिवंत असण्याचं वृत्त कळताच त्यांनाही धक्का बसला . डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केलं याचा पुरावा मागितला असता ते पुरावा सादर करू शकले नाही. पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत