३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भारताच्या पारुलला रौप्य तर प्रीतीला कांस्य पदक

भारताने एकाचं इवेंटमध्ये दोन पदकं जिंकली

३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भारताच्या पारुलला रौप्य तर प्रीतीला कांस्य पदक

चीनच्या हँगझाऊ शहरात खेळवल्या जात असलेल्या आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. ही पदकांची कमाई अजूनही सुरूचं असून स्टीपलचेस प्रकारात भारताने एकाचं इवेंटमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. भारतीय महिलांनी ही अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे.

सोमवार, २ ऑक्टोबर रोजी महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताने एकाचं इवेंटमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. पारुल चौधरी हिने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं तर प्रीती हिने कांस्य पदकाची कमाई केली. स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारतीय खेळाडून एकूण १५ पदकांची कमाई केली होती. आता ऍथलेटिक्स खेळ प्रकारांना सुरुवात झाली आहे. यात भारताला आणखी पदकं मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी महिलांचा ३००० मीटर स्टीपलचेस इवेंट पार पडला. यात भारताच्या दोन धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. सहभाग नोंदवलेल्या पारुल चौधरी आणि प्रीतीने पदक जिंकत भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर घातली आहे.

हे ही वाचा:

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !

जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

यापूर्वी रविवारी ३००० मीटर स्टीपलचेस प्रकाराच बीडच्या अविनाश साबळेने सुवर्ण पदक जिंकले होते. आता सोमवारी महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताने एकाचं इवेंटमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. अविनाश ८ मिनिटे १९:५३ सेकंद वेळेसह पहिला राहिला. इराणच्या हुसेन केहानीचा ८ मिनिटे २२:७९ सेकंद हा त्याचा विक्रम अविनाश साबळेने मोडीस काढला.जपानच्या र्योमा आओकी आणि सेया सुनादा यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Exit mobile version