26 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरविशेषआत्महत्या वाढल्या; पण परिणाम महिलांपेक्षा पुरुषांवर अधिक!

आत्महत्या वाढल्या; पण परिणाम महिलांपेक्षा पुरुषांवर अधिक!

Google News Follow

Related

कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि पुरुष प्रौढांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. मुंबई पोलिसांकडून आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. २०२० मध्ये एकूण १२८२ नागरिकांनी आत्महत्या केली, २०१९ मध्ये १२२९ आत्महत्या झाल्या होत्या.

आकडेवारीनुसार लॉकडाऊनचा परिणाम महिला प्रौढांच्या तुलनेत पुरुष प्रौढांवर अधिक दिसून आला आहे. २०२० मध्ये महिला प्रौढांमध्ये (वय १८ ते ६०) आत्महत्या करण्याचे प्रमाण १३ टक्के कमी झाले. २०१९ मध्ये ३१२ महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. २०२० मध्ये हे प्रमाण २६९ वर घसरले, तर त्याच काळात पुरुष प्रौढांच्या आत्महत्या १४ टक्क्यांनी वाढल्या. २०१९ मध्ये ७१५ पुरुषांनी आत्महत्या केली होती आणि २०२० मध्ये ही संख्या वाढून ८१६ झाली. त्यामुळे लॉकडाऊनचा विपरीत परिणाम हा पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर महिलांपेक्षा अधिक झाला आहे.

आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती मिळवली. आर्थिक नुकसान, नोकरी गमावणे आणि मादक पदार्थांच्या व्यसनामुळे पुरुष प्रौढांनी असे आत्मघातकी पाऊल उचलले आहे. तसेच  घरात कौटुंबिक सुसंवादाने महिला प्रौढांमध्ये आत्महत्या कमी केल्या आहेत, असे घाडगे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

डबेवाला भवन अजूनही स्वप्नच; पदरी निराशा

‘जनाब राऊत एमआयएम की मोहब्बत कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे’

केवळ कमाल! झिऑन हातांनी धावत गेला २० मीटर

काय आहे आयुष्यमान भारत कार्ड?

ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर लॉकडाऊनचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे त्यांच्या आत्महत्यांमध्ये ३१ टक्के वाढ झाली आहे. विशेषत: महिला ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्यांमध्ये ६० टक्के वाढ झाली आहे. २०१९ मध्ये हा आकडा २३ होता, जो २०२० मध्ये वाढून ३७ झाला. तर पुरुष ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्या २१ टक्क्यांनी वाढल्या. २०१९ मध्ये ६९ वृद्ध पुरुषांनी आत्महत्या केली होती, २०२० मध्ये हा आकडा वाढून ८४ झाला.

२०१९ च्या तुलनेत तरुण आणि मुलांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये १३ टक्क्यांची घट झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान हा वर्ग त्यांच्या पालकांच्या सतर्क नजरेखाली होता. यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या घटना कमी झाल्या आहेत. द यंग व्हिसलब्लोअर फाउंडेशनचे संयोजक जितेंद्र घाडगे यांच्या मते, “एकूणच लॉकडाऊनचा नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम पूर्णपणे दुर्लक्षित केला गेला आहे, ज्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. आशा आहे की, भविष्यातील लॉकडाऊनमध्ये सरकार लॉकडाऊनचे नियम तयार करताना नागरिकांच्या मानसिक आरोग्याचा विचार करेल आणि लॉकडाऊन आणि महामारीचा सामना करण्यास असमर्थ असणाऱ्यांना मदत करण्यासाठी पूर्णपणे तयार असेल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा