पाकिस्तानमधील शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशविरोधी कारवायांमुळे पीटीआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे माहिती मंत्र्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. दरम्यान, इम्रान खान यांचा पीटीआय पक्ष पाकिस्तानातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. तसेच
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षावर बंदी घालणार असल्याची माहिती पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी सोमवारी (१५ जुलै) पत्रकार परिषदेत दिली. देशाला योग्य दिशेने पुढे जायचे असेल तर पीटीआयचे अस्तित्व संपवणे आवश्यक असल्याचे मंत्र्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, ९ मेची दंगल, परदेशी निधी आणि सायफर प्रकरण अशी प्रकरने लक्षात घेऊन, आमच्याकडे असलेल्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे पीटीआयवर बंदी घातली जाऊ शकते.
हे ही वाचा:
‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन
चीन समर्थक केपी ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी !
महिलांना मोफत बस प्रवास देणाऱ्या कॉंग्रेसच्या शक्ती योजनेमुळे कर्नाटक परिवहन बुडाली
अर्जेंटिनाने रचला इतिहास; अमेरिका कोपा ट्रॉफीवर सलग दुसऱ्यांदा कोरले नाव !
ते पुढे म्हणाले की, इम्रान खान यांनी आपल्या राजकीय इच्छांसाठी देशाचे राजनैतिक संबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांच्यावर विदेशी निधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यावर ९ मेच्या दंगलीचा गुन्हा देखील सिद्ध झाला आहे. इतरही अनेक प्रकरणे आहेत ज्यात ते दोषी आहेत. हे सर्व पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्र्याने सांगितले.