इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) पक्षाने ओमर अयुब यांचे नाव पाकिस्तानचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. असे वृत्त पाकिस्तानमधील स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
हेही वाचा..
भाच्याकडून मामा मामीकडे एक कोटी खंडणीची मागणी, भाच्याला अटक!
शेतकऱ्यांकडून राजकीय विधाने योग्य नाहीत
सिगारेट न दिल्याने तरुणाचा खून, तीन आरोपी ताब्यात!
येरवाडा कारागृहात आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण
दरम्यान खान यांची पीटीआय पक्षाचा पाठींबा असलेल्या अपक्षांचा मोठा गट आहे. त्यांनी १०१ विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. मात्र केवळ मान्यताप्राप्त पक्ष किंवा पक्षांच्या युतीद्वारेच सरकार स्थापन केले जाऊ शकते म्हणून त्यांना दुसऱ्या गटात सामील व्हावे लागेल. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) आघाडी सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांदरम्यान ही घोषणा करण्यात आली अयुब यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कोण आहे उमर अयुब?
२६ जानेवारी १९७० रोजी जन्मलेले उमर अयुब हे प्रसिद्ध असलेल्या अयुब खान कुटुंबातील असून त्यांचे आजोबा जनरल मुहम्मद अयुब खान हे पाकिस्तानचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचे वडील गोहर अयुब खान यांचीही महत्त्वपूर्ण राजकीय कारकीर्द होती. त्यांनी नॅशनल असेंब्लीचे सदस्य म्हणून काम केले आणि विविध मंत्रीपदे भूषवली होती. उमर अयुबने पाकिस्तान आणि परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण पाकिस्तानमध्ये पूर्ण केले आणि नंतर उच्च शिक्षण परदेशात घेतले. त्यानंतर त्यांनी पीटीआय पक्षात प्रवेश केला. अयुब यांनी गेल्या काही वर्षांपासून पीटीआय पक्षात आणि सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.त्यांनी आर्थिक व्यवहार मंत्री, ऊर्जा मंत्री आणि पेट्रोलियम मंत्री यासह विविध मंत्रीपदे सांभाळली आहेत.