चीनची लस घेतल्यानंतर इम्रान खानला कोविड

चीनची लस घेतल्यानंतर इम्रान खानला कोविड

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केलं आहे.

इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी चीनची कोरोना लस सिनोफार्म टोचून घेतली होती. कोरोना लसीसाठी पाकिस्तान चीनवर अवलंबून असून आता चीनची लस घेतल्यानंतरच खान यांना कोरोनाची लागण झाल्याने चीनची कोरोना लस सेफ आहे का? याबाबत शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

हे ही वाचा:

मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह

प्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे

कुंपणावरचे कावळे… छोटे-मोठे!

पाकिस्तानात आज या वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले. पाकिस्तानात ३८७६ कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे पाकमधील कोरोना संक्रमणाचा दर ९.४ टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत ६२३,१३५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ४० लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १३,७९९ झाली आहे. देशात आतापर्यंत ५७९,७६० लोक कोरोना मुक्त झाले आहेत. तर २,१२२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version