बांगलादेशातील हिंदू, महिला अत्याचार, समान नागरी कायदा…पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केले परखड भाष्य !

पंतप्रधान मोदींकडून सलग ११ व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

बांगलादेशातील हिंदू, महिला अत्याचार, समान नागरी कायदा…पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केले परखड भाष्य !

भारताच्या ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयावर पंतप्रधान मोदी बोलले. विकसित भारताचा संकल्प, भाजप सरकारचे काम, युनिफॉर्म सिविल कोड, संविधान आणि बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार अशा अनेक विविध विषयांवर पंतप्रधान मोदींनी भाष्य केले. पंतप्रधान मोदींनी महिलांवर अत्याचार होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्यांवर संताप व्यक्त केला. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगारांमध्ये भीती असणे आवश्यक आहे. शिक्षेवर व्यापक चर्चा व्हायला हवी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ११ व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. पंतप्रधान मोदी भाषण करताना म्हणाले की, देशात काही चिंतेच्या बाबी आहेत. मला इथून माझी वेदना मांडायची आहे. आपल्या माता, मुली, बहिणींवर होत असलेल्या अत्याचारांचा समाज म्हणून विचार करायलाच हवा. देशात होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे लोकांच्या मनात राग आहे. राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. महिलांवरील गुन्ह्यांचा लवकर तपास व्हावा. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. कारण समाजात विश्वास संपादन करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा त्यांची खूप चर्चा होते. पण हे करणाऱ्या राक्षसी माणसाला शिक्षा झाली की, या बातम्या दिसत नाहीत. कुठेतरी या बातम्या कोपऱ्यात दिसतात. यावर चर्चा होत नाही. आता असे पाप करणाऱ्या गुन्हेगारांबद्दल व्यापक चर्चा व्हायला हवी. जेणेकरून असे पाप करणाऱ्यांनाही फासावर लटकावे लागेल अशी भीती वाटावी. ही काळाची गरज आहे. राक्षसीवृत्ती असणाऱ्या लोकांमध्ये ही भीती निर्माण करणे महत्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

हे ही वाचा..

पवारांनी वाटोळे केले ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…

विभाजन विभिषिका दिवस: फाळणीने हिंदूंना दिलेल्या वेदनेची एक कहाणी

तोंडावर आपटणाऱ्या वाचाळवीरांना आवरा !

फारुखीचा मराठीद्वेष; कुठे आहेत मराठीचा कैवार घेणारे नेते?

आता सेक्युलर सिविल कोडच्या दिशेने गेलं पाहिजे
पंतप्रधान मोदींनी समान नागरी संहितेवर भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘आपल्या देशात समान नागरी संहितेची चर्चा सुरू आहे. आपण जे सिविल कोड घेऊन जगात आहोत, ते खरंतर कम्युनल सिविल कोड आहे. भेदभाव करणारं सिविल कोड आहे. संविधानाची भावना जे सांगतेय, सुप्रीम कोर्ट जे सांगतय, संविधान निर्मात्यांच स्वप्न पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. या गंभीर विषयावर देशात व्यापक चर्चा झाली पाहिजे. प्रत्येकाने विचार मांडले पाहिजेत. जे कायदे धर्माच्या आधारावर देशाच विभाजन करतात, उच, नीच करतात अशा कायद्यांना आधुनिक समाजात स्थान नाही. युनिफॉर्म सिविल कोडमध्ये ७५ वर्ष घालवली. आता सेक्युलर सिविल कोडच्या दिशेने गेलं पाहिजे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

बांगलादेशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली
बांगलादेशात जे काही झाले आहे. शेजारी देश असल्याने आम्हाला परिस्थितीची चिंता आहे. तेथील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा आहे. तसेच तेथील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी घेतली पाहिजे. आपले शेजारी देश सुख आणि शांतीचा मार्ग अवलंबू दे. आम्ही शांततेसाठी समर्पित आहोत. आगामी काळात बांगलादेशच्या विकासाच्या प्रवासात आम्ही सदैव हितचिंतक राहू. आपण मानवजातीसाठी विचार करणारी माणसे आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version