देशाला दिशा देण्याच्या कामात मीडियाचा महत्वाचा रोल!

इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन

देशाला दिशा देण्याच्या कामात मीडियाचा महत्वाचा रोल!

वांद्रे -कुर्ला संकुलातील इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या आई एन एस टॉवर चे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हस्ते आज पार पडले. इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या सर्व सदस्यांना आज एक नवे विशाल आणि आधुनिक भवन मिळाले आहे. मला आशा आहे की या नवीन भवनामुळे तुमच्या कामाचा जो विस्तार होईल त्याचा आमच्या लोकशाहीला देखील फायदा होईल, असे यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा आधी व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते.

इंडियन न्यूजपेपर सोसायटी स्वातंत्र्यापूर्वीची असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, देशातील परिस्थिती बदलण्यासाठी दिशा देण्याच्या कामात मीडियाचे एक महत्वाचा रोल आहे. भारताचा पुढील २५ वर्षांचा प्रवास खूप महत्वाचा असणार आहे. या २५ वर्षात भारत विकसित बनण्यासाठी पत्रकार-पत्रकारिकांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे. देशाला जागृत करण्याचे काम, नागरिकाला त्याच्या अधिकाराची आठवण करून देण्याचे त्यांच्यात सामर्थ्य देण्याचे काम मीडिया करते.

हे ही वाचा:

मुंबईसह कोकणपट्ट्यात धुवांधार 

“विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढू”

ओडिशाच्या राजपालांच्या मुलावर मारहाणीचा आरोप!

अंबानींच्या विवाह सोहळ्यात काँग्रेस नेत्यांसह इंडी आघाडीचे वऱ्हाड

यावेळी त्यांनी सर्वांसमोर विनंती केली. ते म्हणाले की, देशाच्या हितासाठी देशाने चालू केले कार्यक्रम, अभियान, योजना या केवळ सरकारच्या आहेत म्हणून दुर्लक्ष करू नका. यामध्ये मीडियाचा फार मोठा रोल असतो. जेव्हा जास्तीत जास्त मीडिया हाऊस अशावेळी जोडले जातील तेव्हा पुढील येणाऱ्या पिढीला याचा खूप फायदा होणार आहे. तुम्ही सर्वानी सरकारचा नाहीतर देशाचा प्रयत्न असल्याचे मानून पुढे नेण्याचे काम करा, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Exit mobile version