महत्वाचे सामने इंग्लंडमध्ये घेऊ नयेत, इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूचे विधान

महत्वाचे सामने इंग्लंडमध्ये घेऊ नयेत, इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूचे विधान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेट रसिक बऱ्यांच दिवसांसून वाट पाहत होते. या फायनल सामन्यासाठी आतापर्यंत दोन्ही संघांनी कष्ट घेतले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी बजावली. हा अंतिम सामना रोमांचक होण्याची अपेक्षा होती, परंतु साऊथॅम्प्टनच्या हवामानाने अंतिम सामन्याची माती केली. पावसाने क्रिकेट रसिकांच्या आनंदावर विरजन पडलं. अशातच इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केवीन पिटरसनने इंग्लंडमध्ये एवढी महत्त्वाची मॅच खेळवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे, असं रोखठोक मत मांडलं आहे.

इंग्लंडच्या धर्तीवर एवढी महत्त्वाची मॅच खेळवायला नको होती. अस्थिर हवामानासाठी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळवायला नको होती. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. परंतु पावसाने दोन दिवस वाया घालवले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलचा आजचा चौथा दिवस आहे. यातून पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पूर्णपणे न्हावून निघाला. दोन्ही दिवशी एकही बॉल फेकला गेला नाही. तर दुसर्‍या दिवशी खराब प्रकाशामुळे नियोजित वेळेपूर्वीच सामना थांबवावा लागला. आतापर्यंत फक्त तिसर्‍या दिवसाचे खेळ पूर्णत: खेळला गेला आहे. चार दिवसांच्या खेळामध्ये फक्त १४१.१ षटकं फेकली गेली आहेत.

एवढा महत्त्वाचा सामना साऊदॅम्प्टनला का? असा प्रमुख सवाल पीटरसनने केला. मला हे बोलताना दु:ख होतंय पण इंग्लंडच्या धर्तीवर हा सामना खेळवायला नको होता, असं पीटरसन म्हणाला.

हे ही वाचा:

संजय राऊत हे शरद पवारांच्या पे रोलवर

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये पाठवणार

देशात २४ तासात ८७ लाखांपेक्षा जास्त लसीकरण

तीन महिन्यांनी कोरोना रुग्णसंख्या ४३ हजारांखाली

सामन्यात आतापर्यंत एका संघाचा एक डाव संपला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण भेटलेल्या भारतीय संघाने सर्वबाद २१७ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल न्‍यूझीलंड संघाने दोन विकेट गमावून १०१ धावा केल्या आहेत. म्हणजेच ११६ धावा न्यूझीलंड संघ पिछाडीवर आहे. सामन्याचा चौथा दिवस असल्याने हा सामना ड्रॉ च्या दिशेने चाललेला आहे. अशात जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेत्याच्या रूपात घोषित केलं जाईल.

Exit mobile version