सीबीएसई परिक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय

सीबीएसई परिक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय

भारतामध्ये कोविडचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईच्या १०वीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या असून १२वीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.

या पार्श्वभूमीवर १०वीचे निकाल बोर्डाने ठरवलेल्या काही मार्गदर्शक सुचनांनुसार तयार केले जाणार आहेत, तर १२वीच्या परिक्षा नंतर घेतल्या जाणार आहेत. बोर्डाकडून १ जून रोजी, एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.

हे ही वाचा:

उद्धव यांच्यापेक्षा राज एक पाऊल पुढे!

राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?

योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

पुण्यातील व्यापारी लॉकडाऊन विरुद्ध उच्च न्यायालयात

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १०वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत चाचण्यांतील गुणांनुसार मार्क दिले जाणार आहेत. जर एखाद्या विद्यार्थी त्याच्या गुणांबाबत असंतुष्ट असेल तर त्याला जेव्हा परिस्थिती सामान्य होईल त्यावेळी परिक्षा देता येईल.

कोविड-१९ची दुसरी लाट देशातील काही राज्यांवर धडकली आहे. देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात दररोज रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी आणि नेत्यांनी कोविड-१९ चा काळ लक्षात घेऊन बोर्डाच्या परिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. गेल्या चोविस तासात देशात आत्तापर्यंतची उच्चांकी रुग्णवाढ नोंदली गेली आहे.

दरवर्षी लक्षावधी विद्यार्थी सीबीएसईच्या १०वी आणि १२वीच्या परिक्षांना बसतात.

Exit mobile version