राज्यात यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. तेवढ्याच जल्लोषात राज्यात गणरायाला निरोपही दिला गेला. त्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीने जुने विक्रमही मोडले आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक काल संध्याकाळी सुरु झाली होती ती मिरवणूक आज, १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ नंतर संपली.
२४ तासांपासून अधिक लांबलेली मिरवणुकीची चर्चा सर्वत्र सुरु होती. १३० वर्षांच्या दगडूशेठ गणपतीच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ चाललेली मिरवणूक होती. याबद्दल दगडूशेठ हलवाई गणपतीचे ट्रस्टी(कोषाध्यक्ष) महेश सूर्यवंशी यांना प्रतिक्रिया विचारली होती. त्यांनी मिरवणूक लांबल्याचे कारण सांगितले आहे. पोलीस प्रशासनासोबत अनेक गणेश मंडळांच्या बैठका झाल्या आहेत. आम्ही आमचा अनुभव त्यांना सांगितलेला आहे, त्यांनी देखील नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काही कमतरता नियोजनात निश्चितपणे राहिलेल्या दिसत आहेत, त्यामुळेच हा विलंब झाल्याचे दिसून आले असल्याचे महेश सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
यंदा दोन वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा झाला. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आणि मंडळांमध्ये दिसून आला. गणेशोत्सवाचे नऊ दिवस अत्यंत आनंदात, उत्साहात आणि भक्तीभावात व श्रद्धेने पार पडले. आजचा जो विसर्जनचा दिवस आहे, त्या विसर्जनास आम्हाला विलंब झालेला आहे. तरीदेखील गणपती बाप्पांनी भक्तांना जो दर्शनाचा लाभ दिलेला आहे. बाप्पांचा रथ जसजसा पुढे जात होता, भाविक अजिबात जागचे हलले नाहीत. भाविकांची संख्या अधिकच वाढत होती. आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर होते. खूप मोठ्याप्रमाणावर भाविकांनी गर्दी केली, असंही महेश सूर्यवंशी म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’
राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा
बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि
विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी
विसर्जन कार्यक्रम हा वेळेत सुरू झालेला आहे. दगडूशेठ गणपती बाप्पाचं प्रतिवर्षी साधारण सात वाजता विसर्जन होतं, यावेळेला ते ११ वाजून २० मिनिटांनी झालेलं आहे. त्यामुळे काहीसा विलंब निश्चितच झाला असल्याचे महेश सूर्यवंशी म्हणाले.